कोल्हापूर | महाआघाडीने जागा वाटप सुरु केले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाआघाडीने एकाच जागेची ऑफर दिली होती. मात्र राजू शेट्टी तीन जागांवर ठाम आहेत. त्यांना फक्त हातकणंगले ही एकच जागा द्यायचे महाआघाडीने ठरवले आहे, मात्र त्यांना वर्धा आणि बुलढाणा येथील जागा हव्या आहेत.
महाआघाडीच्या या ऑफरमुळे स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. २७ फेब्रुवारीला माढ्यात स्वाभिमानाने एल्गार मेळाव्याचे आयोजन केले आहे.तर २८ फेब्रुवारीला पुण्यात कार्यकारणी मेळावा होणार आहे. रात्री १२ वाजता झालेल्या बैठकीत स्वबळाचा नारा देण्याचे ठरले आणि पुण्यात होणाऱ्या मेळाव्यात स्वाभिमानी आपला उमेदवार घोषित करू शकते.
शेतकरी संघटना हातकणंगले, बुलढाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली, धुळे, शिर्डी, लातूर अशा नऊ ठिकाणी उमेदवार देण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाचे –
गाडगे महाराज वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक…
नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजेंनी खाल्ली एकत्र मिसळ, उदयनराजेंना बसणार झणझणीत ठसका?