अभिनेता स्वप्निल जोशीने सोशल मीडियासंदर्भात घेतला ‘हा’ निर्णय

Swapnil Joshi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय म्हणून स्वप्नील जोशी याची ओळख आहे. स्वप्नील जोशी हा चित्रपटांबरोबरच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. स्वप्नील जोशी हा लाईव्ह व्हिडीओ, फोटो, विविध प्रकारच्या पोस्ट यांच्या माध्यमातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. मात्र आता स्वप्नील जोशी याने सोशल मीडियासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

https://www.instagram.com/p/COFU3rbFDbv/?utm_source=ig_embed

काय आहे स्वप्नील जोशीचा निर्णय
स्वप्निल जोशी याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्वप्निल जोशी म्हणाला कि, “पुढचे काही दिवस मी सोशल मीडियावर माझे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करणार नाही. सोशल मीडियाचा वापर आपण कोरोनाचे युद्ध जिंकण्यासाठी करायला हवा. त्यामुळे काही दिवस एकतर मी सोशल मीडियावर सक्रिय नसेल किंवा असलो तरी त्या पोस्ट कोरोना संबंधित असतील.

त्यामध्ये कोरोनाची माहिती असेल, एखाद्याला मदत हवी असेल तर त्याचे आवाहन करण्यात येईल. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर मी मनोरंजनाच्या पोस्टसाठी वापरणार नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय.” असे त्यांनी व्हिडिओद्वारे सांगितले आहे.