छत्रपती संभाजीराजेंची मोठी घोषणा!! स्वराज्य संघटना 2024 च्या निवडणुका लढवणार

sambhaji raje
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आणि भाजप आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच चुरस असताना आता राज्याच्या राजकारणात आणखी एका नव्या पक्षाची एंट्री झाली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांची स्वराज्य संघटना 2024 ची निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. आज पुण्यात संभाजी राजे यांच्या उपस्थितीत स्वराज्य भवनाचा लोकार्पण सोहळा पार पाडला. यानंतरच्या आयोजित पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी 2024 ची निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

संभाजीराजे म्हणाले, स्वराज्य यापुढे सक्षम पर्याय म्हणून येणार आहे. त्यामुळे 2024 साली होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागा. स्वराज्य संघटना कुठल्याही परिस्थितीत 2024 ला निवडणूक लढवणार आहे अशी घोषणा संभाजी राजे यांनी केली. राजकारणी आपला खेळ खेळायला चालले. तेच नेते तीच चर्चा, यापेक्षा वेगळं काही नाही. त्यामुळे आता आपल्याला स्वराज्याच्या माध्यमातून जनजागृती करायची आहे, तसेच सामान्य शेतकऱ्यांना ताकद करण्याचं काम करायचं असे संभाजीराजे म्हणाले.

आजचे काही प्रस्थापित लोक माजलेले आहेत पण, ही त्यांची चूक नसून आपली आहे. कारण, आपण त्यांना निवडून देतो. आणि एकदा का निवडून आले कि ते नेते आपला रंग दाखवितात. वेळप्रसंगी ही मंडळी शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, महासंताचे नाव घेतात. आणि दुसरीकडे जनतेचा खेळखंडोबा करणे सुरूच ठेवतात असं म्हणत संभाजीराजे यांनी इतर राजकीय पक्षांवर निशाणा साधला.