Sunday, February 5, 2023

‘स्वर्ग रथालाही’ थांबावे लागले देवळाई रेल्वे फाटकावर !

- Advertisement -

औरंगाबाद – काल अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या एका ‘स्वर्ग रथाला’ शिवाजीनगर रेल्वे फाटकावर फाटक बंद असल्याने दुतर्फा गर्दी मध्ये अडकावे लागले. यामुळे सातारा देवळाई करांच्या नशिबी आलेली अवहेलना मृत्यूनंतरही थांबत नसल्याचे दिसून आले आहे.

शिवाजीनगर रेल्वे फाटकावर भुयारी रस्ता की पूल होणार याविषयी चा संभ्रम अद्यापही कायम आहे. परंतु, दैनंदिन कामकाजासाठी जाणाऱ्या नागरिकांना रोज अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या परिसरातील नागरिकांनी आंदोलने, निदर्शने, उपोषण करूनही निर्णय होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

- Advertisement -

दुचाकी तसेच चारचाकी चा अडथळा रोजचा झाल्याने कुणाला काहीही वाटत नाही. परंतु, जेव्हा मृतदेह रांगेत थांबवला जातो त्यावेळी इतर पादचाऱ्यांची अवस्था किती गंभीर होत असेल, ही कल्पना न केलेलीच बरी अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.