मलिकांच्या आरोपावर मनिष भानुशालींनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी २ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला. या कारवाई प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप व एनसीबीला प्रश्न विचारले. मलिकांच्या प्रश्नांना मनिष भानुशालींनी प्रत्युत्तर दिले आहे. “देशहिताचं जे काम आहे ते आम्ही केले. नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यात तथ्य नसल्याचे भानुशालींनी म्हंटले आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना भानुशाली म्हणाले की, “ मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर आम्ही कारवाई केली नाही. तर ती कारवाई एनसीबीने केली आहे. कारवाईवेळी मी फक्त सोबत चाललो होतो. आम्हाला जी माहिती मिळाली होती ती साक्षही नोंदवायची होती म्हणून आम्ही गेलो होतो. नवाब मलिकानी माझ्यावर जे आरोप केले आहेत त्यात तथ्य नाही. भाजपामध्ये माझ्याकडे कुठलंही पद नाही. के. पी. गोसावी कोण आहेत तेदेखील मला माहित नाही”, असे भानुशाली यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त्र नवाब मलिक यांनी एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर थेट पत्रकार परिषद घेत आरोप केले. यावेळी त्यांनी भाजप व मनीष भानुशाली यांचे पार्टीच्या कारवाईबाबत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्याबाबत भानुशालींनी माध्यमांशी संवाद साधत मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

Leave a Comment