फलटण | साखरवाडी, ता. फलटण येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने कामगारांना दिवाळी सणानिमित्त 19 टक्के बोनस व मागील काळातील थकीत एक पगार देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. कारखाना कार्यस्थळावर विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीदत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारु, परीक्षित रुपारेल व कामगार युनियन पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला प्रशासकीय अधिकारी अजित जगताप, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, राजेंद्र गायकवाड, पोपट भोसले, खजिनदार गोरख भोसले, तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश भोसले, संजय जाधव, बाळासो भोसले, संतोष भोसले, निवृत्ती भोसले, मच्छिंद्र भोसले, महेश पवार, लक्ष्मण साळुंखे, सुरेश भोसले उपस्थित होते.
कामगारांना थकीत एक पगार व 19 टक्के देण्याबरोबरच जुना बोनस कारखान्यातील सर्व कामगारांना दहा किलो साखर मोफत देणार आहे. तसेच कारखाना विस्तार वाढीचे काम युद्धपातळीवर सुरु असून दि. 4 नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरु होणार असल्याची माहिती संचालक जितेंद्र धारु यांनी दिली.