व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कार – ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा जवळ स्विफ्ट कार व ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातात कार मधील पाच जणांचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दवी घटना सोमवारी (दि.२२) रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.औरंगाबादहून अहमदनगरच्या दिशेने जात असलेल्या स्विफ्ट कारची श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ बससोबत भीषण धडक झाली

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार यातील स्वीफ्ट कार (क्रमांक एमएच २१ बीएफ ७१७८) औरंगाबादहून नगरकडे येत होती. देवगड फाट्याजवळ नगरकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसशी (एमएच १९ वाय ७१२३) तिची धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले. ते सर्वजण जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते. अपघातात कार बसच्या समोरील बाजूने घुसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु केले. जखमींना ग्रामीण रुग्णालय, नेवासा फाटा येथे नेण्यात आले. परंतु पाचही जणांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. नेवासा पोलीस या प्रकरणी पुढील कार्यवाही करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’