मुंबई । लॉकडाऊनमुळं अनेक व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्यामुळं या व्यवसायांशी जोडले गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. अनेक कंपन्या व्यवसाय बंद किंवा कमी झाल्यानं कर्मचारी कपात करत आहेत. लॉकडाऊनमुळे Swiggy या ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीने ११०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत विविध शहरांतील Swiggyच्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात होईल.
दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच Zomato ने ही आपल्या ५०० कर्मचाऱ्यांना इतरत्र नोकरी शोधण्यास सांगितले होते. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात जवळपास २ महिने लॉकडाऊन आहे. आता लॉकडाऊनचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे रेस्टाँरंट आणि हॉटेल व्यवसाय अजून काही दिवस ठप्प राहणार आहे. Swiggy आणि Zomato यासारख्या Online food Delivery App ना याचा मोठा फटका बसला आहे.
कोरोनामुळे कदाचित फूड डिलिव्हरी आणि ई-कॉमर्स व्यवसायाला दीर्घकाळ फटका सहन करावा लागेल. कोरोनाचे संकट आणखी किती काळ राहणार, हे सांगता येत नाही. तरीही आपण हिवाळ्यापर्यंत सर्व परिस्थिती सुरळीत होईल, अशी आशा करुयात. यानंतर आपला व्यवसाय अधिक जोमाने धावेल, असा विश्वास Swiggy चे सीईओ श्रीहर्ष मजेटी यांनी व्यक्त केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”