मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 जणांच्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हि टीम टी-20 वर्ल्ड कपचा 14 वर्षांचा वनवास संपवतील अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे. याआधी 2007 साली भारताने पहिल्यांदाच झालेला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता, पण यानंतर मात्र टीमला पुन्हा हा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. वर्ल्ड कपसाठी 15 जणांच्या टीमची घोषणा करण्यात असली तरी कोरोनाचं संकट आणि खेळाडूंच्या दुखापतींची टांगती तलवार असल्यामुळे टीममध्ये काही राखीव खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
टी-20 वर्ल्ड कपला 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 14 नोव्हेंबरला फायनल होणार आहे. भारताचा पहिलाच मुकाबला पाकिस्तानविरुद्ध 24 ऑक्टोबरला होणार आहे. तर टीम इंडिया 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध आणि 3 नोव्हेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. तर 5 नोव्हेंबरला क्वालिफायरमधून आलेल्या ग्रुप बीच्या टॉप टीमविरुद्ध आणि 8 नोव्हेंबरला क्वालिफायरच्या ग्रुप एच्या दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या टीमसोबत भारताची लढत होणार आहे.
भारतीय टीम
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर