आयटीपीबी जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, ६ जवानांचा मृत्यु तर २ जण गंभीर

छत्तीसगडमधील नारायणपुर जिल्हयामध्ये इंडो-तिबेटियन बोर्डर पोलीस दलातील जवानांमध्ये झालेल्या वादविवादात जवानाने च आपल्या इतर सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये सहा जवानाचा मृत्यु झाला असून दोन जवान गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेच्या चौकशीचे तातडीने आदेश दिले आहेत.

वाढदिवसानिमित्त अमित शहांवर शुभेच्छांचा वर्षाव

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सरकारमध्ये बहुमूल्य योगदानासोबतच भारताला सशक्त आणि सुरक्षित बनवण्यासाठी ते महत्त्वाचं योगदान देतायेत. ईश्वर त्यांना दीर्घायूष्य देवो अशा शब्दात मोदींनी शाह यांना शुभेच्छा दिल्यात.

अतुल भोसलेंना एकदा आमदार तर करा मी त्यांना महाराष्ट्राचा नेता बनवेल – अमित शहा

‘अतुल भोसले ना एकदा आमदार करा मी त्यांना महाराष्ट्राचा नेता करेन’ असे ठोस आश्वासन केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कराड येथे दिले. सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जाहीर प्रचार सभेत शहा बोलत होते. यावेळी दोन्ही मतदारसंघांचे उमेदवार उदयनराजे आणि अतुल भोसले यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याची अमित शहा यांनी उपस्थित लोकांना विनंती केली.

कर्नाटकातून जतला कृष्णेचे पाणी देणार; अमित शहा यांची ग्वाही

म्हैसाळ, टेंभू योजनेसाठी भरीव निधी दिल्यामुळे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा कायापालट झाला. जतला आता तुबची बबलेश्वर योजनेच्या माध्यमातून कर्नाटक शासनाकडून पाणी देण्यात येेईल, यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा व देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे, पाणी निश्चित मिळेल,’ अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांनी जत येथे बोलताना दिली.

अमित शहांच्या विरोधात काँग्रेसकडून हा उमेदवार

Untitled design T.

दिल्ली प्रतिनिधी / काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी गुजरात गांधीनगर येथील आपल्या उमेदवाराची घोषणा केली. भाजपकडून अमित शहा गुजरात मधील गांधीनगर येथून लोकसभा निववडणूक लढणार आहेत.गुजरातचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. सी. जे. चावडा यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. चावडा उत्तर गांधीनगरमधून आमदार आहेत. काँग्रेसचे उमेदवार आणि आमदार सी. जे. चावडा यांनी आपली सरकारी नोकरी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश … Read more

मुंबईची खलबत गेली दिल्लीला, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अमित शहा करणार खासदारां सोबत चर्चा

Thumbnail

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात रान तापलेले असताना भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप खासदारांची राजधानी दिल्लीत बैठक बोलावली असल्याचे समजत आहे. मराठा समाज लोकप्रतिनिधींच्या घरा समोर निदर्शने करत असल्याची बाब अमित शहांनी गांभीर्याने घेतली असून त्यावर तोडगा काढण्यासाठी आणि आगामी काळात या मुद्द्याला पकडून रणनीती आखण्यासाठी शहा यांनी बैठक बोलावल्याचे बोलले … Read more

कोण आहे हा अमित शहा – राज ठाकरे

Thumbnail

नवी मुंबई | अमित शहांचा एकेरी उल्लेख करत मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर चौफेर टीका केली आहे. शहांच्या तोंडावर नेहमी अहंकार दिसतो. मोदींच्या छत्रछायेत शहा यांना राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळाले. या माणसाचे वैयक्तिक कर्तृत्व काय? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी अटल … Read more

नितीश कुमार यांच्याशी आमचं अतूट नातं – अमित शहा

thumbnail 1531404679398

पटना |देशभरात लोकसभा निवडणुकांच्या पुर्वतयारीचे वारे वाहू लागले अाहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सध्या बिहार दौऱ्यावर आहेत. २०१९ च्या निवडणुकांची व्युहरचणा करण्यासाठी शहा दौर्यावर आहेत. दरम्यान शहा यांनी संघटन बांधनीच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश राज्य भाजपला दिले आहेत. नितीश कुमार आणि अमित शहांची आजची भेट यासंदर्भात महत्वपूर्ण ठरली आहे. पटना येथे झालेल्या बैठकीत भाजप … Read more

आम्ही भाजपच्या सोबतच राहणार पण दुर्लक्षित करण्याची चूक भाजपने करू नये-नितीशकुमार

thumbnail 1531048656788

दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये आज जदयुची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या सोबत राहण्याचा ठराव संमत झाला आहे. आम्ही भाजपाच्या सोबत राहू परंतु भाजपने आम्हाला दुर्लक्षित केल्यास भाजपला त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल असे नितीशकुमार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत जदयु ला दोनच जागा मिळाल्या होत्या. … Read more