मुलीकडे एकटक बघणाऱ्या तरुणास सक्तमजुरीची शिक्षा

औरंगाबाद |  तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याकडे वाईट नजरेने एकटक बघणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शुक्रवारी सुनावली. दामोदर कन्हैय्या राबडा असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही ४ मे २०१७ रोजी व्यंकटेशनगर येथील घरातून समोरील बगिच्यामध्ये सायकल खेळण्यास गेली होती. मागील २०-२५ … Read more

जेजुरीहून परतणाऱ्या भाविकांची मिनी बस उभ्या कंटेनरला धडकली; 11 जण जखमी

औरंगाबाद | जेजुरीहून नागपूर कडे जाणाऱ्या भाविकांची मिनीबस रस्त्यावर उभ्या नादुरुस्त कंटेनरला धडकली या भीषण अपघातात बसचा अक्षरशः चुराडा झाला असून 11जण जखमी झाले असून त्यातील तिघे गंभीर आहेत. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.ही घटना आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास औरंगाबाद-अहेमदनगर महामार्गावरील लिंबे जळगाव येथे घडला.जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हर्षदा ठाकरे … Read more

आता बोला! बनावट स्वाक्षरी करुन लिपिकानेच लंपास केले 15 लाख रुपये

औरंगाबाद प्रतिनिधी | आरोग्य विभागाच्या कृष्ठरोग कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या कोषागारातून  मंजुर झालेल्या देयकाची रक्कम कार्यालयीन खात्यावर जमा झाल्यानंतर परस्पर बनावट स्वाक्षरी करुन १५ लाख १२ हजार ६५६ रुपये लंपास करणार्‍या वरिष्ठ लिपीकाला तब्बल तीन वर्षांनंतर बुधवारी पहाटे वेदांतनगर पोलिसांनी गजाआड केले. बाबुराव नागोराव दांडगे असे रक्कम लंपास करणार्‍या वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे. या प्रकरणात कृष्ठरोग कार्यालय, … Read more

चोरटयांनी सोनसाखळी साठी वृद्धाला नेले फरपटत; पहा थरारक Video

औरंगाबाद प्रतिनिधी | चारचाकी मधून आलेल्या चोरट्यानी  रस्त्याने जाणाऱ्या एका 62 वर्षीय वयोवृद्धच्या गळ्यातील साडेचार टोळ्यांची सोनसाखळी हिसकवली एवढेच नाही तर त्या वृद्धाला सुमारे 20 ते 25 फूट फरपटत नेले ही धक्कादायक घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास सिडको एन-5 परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे वाढत्या मंगळसूत्र चोरीच्या घटना … Read more

सहकार अधिकारी लाचेच्या सापळ्यात अडकला; 20 हजाराची लाच घेतांना पकडले

औरंगाबाद प्रतिनिधी |  संस्थेविरुध्द तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने त्या संस्थेचा सकारात्मक अहवाल देण्यासह प्रशासक न नेमण्यासाठी वीस हजाराची लाच स्विकारणा-या सहकार अधिका-याला मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अ‍ॅन्टी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. वाल्मिक माधव काळे असे सहकार अधिका-याचे नाव आहे. मत्स्य व दुग्ध कार्यालयात सहकार अधिकारी म्हणून वाल्मिक काळे कार्यरत आहे. एका संस्थेविरुध्द सहकार अधिकारी काळेकडे तक्रारी … Read more

औरंगाबादेत 27 वर्षीय तरुणाची भोसकून हत्या; पोलिस‍ांकडून 12 तासात संशियितांना बेड्या

औरंगाबाद प्रतिनिधी |  किरकोळ वादानंतर तीन आरोपीनी 27 वर्षीय तरुणाला भोसकून हत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास औरंगपुरा भागातील पिया मार्केट जवळ घडली. सीसीटीव्ही च्या मदतीने रात्री उशिरा सिटीचौक पोलिसांनी तीन संशयित आरोपिना अटक केली. समीर खान सिकंदर खान असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास समीर हा औरंगपुरा भाजी मंडई जवळील … Read more

म्हणून ‘तो’ बनला रिक्षा चालक, आठ ते दहा रिक्षांची केली चोरी

औरंगाबाद प्रतिनिधी । व्यवसायासाठी रिक्षा चालवायला दिली नाही म्हणून एक तरुण चक्क रिक्षा चोर बनला, त्याने आतापर्यंत शहरातील 8 ते 10 रिक्षा चोरल्या आहेत. विशेष म्हणजे तो चोरी केलेल्या रिक्षावरच प्रवासी बसवून धंदा करायचा. त्याला अशाच एका चोरी प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी वाळूज परिसरातून अटक केली आहे. संदीप काशीनाथ वाकळे असे आरोपीचे नाव आहे. … Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अजब कारभार, नापास विद्यार्थ्यांना केली पदवी प्रदान

thumbnail 1531556716003

औरंगाबाद | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अजब कारभाराने शिक्षण क्षेत्राला हादरा बसला आहे. मराठवाडा विद्यापीठाने चक्क दोन नापास विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली आहे. तीन अथवा चार वर्षाचे विद्यापीठाचे पदवी शिक्षण पूर्ण केल्या नंतर त्या विद्यार्थ्यास पदवी प्रदान करण्यात येते. विद्यार्थी नापास झाल्यास त्यास सर्व विषयात पास झाल्यावरच पदवी करता अर्ज करता येतो. परंतु मराठवाडा विद्यापीठाने … Read more