म्हणून ‘तो’ बनला रिक्षा चालक, आठ ते दहा रिक्षांची केली चोरी

औरंगाबाद प्रतिनिधी । व्यवसायासाठी रिक्षा चालवायला दिली नाही म्हणून एक तरुण चक्क रिक्षा चोर बनला, त्याने आतापर्यंत शहरातील 8 ते 10 रिक्षा चोरल्या आहेत. विशेष म्हणजे तो चोरी केलेल्या रिक्षावरच प्रवासी बसवून धंदा करायचा. त्याला अशाच एका चोरी प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी वाळूज परिसरातून अटक केली आहे. संदीप काशीनाथ वाकळे असे आरोपीचे नाव आहे.

संदीप हा बेरोजगार असल्याने त्याने काही वर्षांपूर्वी ओळखीच्या एका व्यक्तीला तिची रिक्षा भाड्याने चालविण्यासाठी मागितली होती. मात्र देण्यास नकार दिल्याने संदीप तेंव्हा पासून उभ्या रिक्षां चोरायचा व त्या चोरीच्या रिक्षा वरच व्यवसाय करायचा. क्रांतिचौक पोलीस ठाणे हद्दीतूंन चोरी झालेली रिक्षा ही वाळूज भागात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.

माहितीच्या आधारे साह्ययक निरीक्षक अजबसिंग जारवाल, हवलदार शिवाजी झिने,प्रकाश चव्हाण,पोलीस नाईक राजेंद्र साळुंके, प्रभाकर राऊत यांच्या पथकाने वाळूज कडे धाव घेत सापळा रचून संदीपला अटक केली व त्याच्या ताब्यातून चोरीची रिक्षा जप्त केली. पुढील कारवाई साठी त्यास क्रांतिचौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. संदीप याने आतापर्यंत 8 ते 10 रिक्षा चोरी केल्या आहेत.तो फक्त रिक्षांचीच चोरी करतो. शिवाय त्या चोरीच्या रिक्षांचे क्रमांक न बदलता त्याच रिक्षमध्ये प्रवासी भाडे घेऊन व्यवसाय करतो व पोलिसांनी पकडले तर रिक्षा स्वाधीन करून देत गुन्हा कबुल करतो असे पोलीसांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like