आता बोला! बनावट स्वाक्षरी करुन लिपिकानेच लंपास केले 15 लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | आरोग्य विभागाच्या कृष्ठरोग कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या कोषागारातून  मंजुर झालेल्या देयकाची रक्कम कार्यालयीन खात्यावर जमा झाल्यानंतर परस्पर बनावट स्वाक्षरी करुन १५ लाख १२ हजार ६५६ रुपये लंपास करणार्‍या वरिष्ठ लिपीकाला तब्बल तीन वर्षांनंतर बुधवारी पहाटे वेदांतनगर पोलिसांनी गजाआड केले. बाबुराव नागोराव दांडगे असे रक्कम लंपास करणार्‍या वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे.

या प्रकरणात कृष्ठरोग कार्यालय, औरंगाबाद येथील सहायक संचालक डॉ. विलास एकनाथ विखे पाटील यांनी तक्रार दिली. २ डिसेंबर २०१९ ला ते कार्यालयात असताना डी.एस. परभणे यांची लेखी तक्रार त्यांना प्राप्त झाली होती. या अनुशंगाने डॉ. विखे पाटील यांनी बील नोंदवहीची पाहणी केली असता परभणे यांनी अर्ज केलेला नसतानाही त्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जानेवारी २०१९ मध्ये ४७ हजार ४९२ रुपये व सप्टेंबर २०१९ मध्ये ८० हजार रुपये वरिष्ठ लिपिक दांडगे याने परस्पर आपल्या नावावर केल्याचे दिसून आले. त्यानंतर तीन डिसेंबर२०१९ ला व्हि.एम. गिरी यांनीही डॉ. विखे पाटील यांच्याकडे एक तक्रार दाखल केली.

मार्च २०१९ पासून ऑक्टोबर २०१९ पर्यंतचे ९० हजार ४९६ रुपये वेतनातून कपात करुन दांडगे याने धुळे, नंदुरबार सहकारी बँक लिमिटेड धुळे यांच्याकडे वर्ग केले नाही. यानंतर डॉ. विखे पाटील यांनी स्वत: व वैद्यकिय अधिकारी डॉ. जी.जी. कल्याणकर यांनी बिलांची लेखी तपासणी, कार्यालयीन बँक स्टेटमेंटची तपासणी केली. त्यावेळी दांडगे याने कार्यालयीन खात्यावरुन स्वत:च्या खात्यावर १५ लाख १२ हजार ६५६ रुपये वर्ग झालेले निर्दशनास आले. कार्यालयीन कामकाजसबंधी चेक बाऊंस चार्जेस सोळा हजार सातशे रुपये असे एकूण १५ लाख २९ हजार ३५६ रुपयांचा अपहार झाल्याचे निर्दशनास आले. प्रकरणात वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment