परभणीत अवैधरित्या शस्त्र विकणाऱ्या औरंगाबादमधील चौघांना अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे सय्यद शहा तुराबूल हक्क उर्स परिसरात धारदार शस्त्र विकणाऱ्या टोळीवर छापा टाकत परभणी पोलिसांनी औरंगाबाद येथील चौघा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेला शस्त्रसाठ्यासह रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे . तुराबुल हक्क दर्गा यात्रेमध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठया प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येतो. अवैध धंद्यांची माहिती काढत कारवाई … Read more

क्रूरता! नवऱ्यानं केली बायकोची हतोड्याने ठेचून निघृण हत्या; विवस्त्र अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी घेतला ताब्यात

औरंगाबाद प्रतिनिधी । पत्नीला विवस्त्र करत हातपाय बांधून हतोड्याने व धारधार हुक ने शरीरावर प्रहार करीत पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील अरुणोदय कॉलनीत उघडकीस आला. हत्या केल्यांनतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपासाला सुरुवात केली आहे. जयश्री राम काळे असे मृत पत्नी चे नाव आहे तर राम काळे … Read more

हिंगणघाटची पुनरावृत्ती औरंगाबादेतही! शरीर सुखाला नकार दिल्याने महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवले

औरंगाबाद प्रतिनिधी । हिंगणघाटमध्ये घडलेल्या प्राध्यपिका जळीत प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असताना आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शरीरसुखाचा नकार दिल्याने एका नराधमाने त्या महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील अंधारी गावात घडली आहे. या घटनेत महिला ९५ टक्के झाली असून त्या महिलेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार … Read more

औरंगाबाद शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी; तीन विद्यार्थी जखमी

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या मारहाणीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील स्वप्नील सोनवणे, अभिजित राऊत व अन्य एक विद्यार्थी असे तीनजण जखमी झाले आहेत.

औरंगाबादमध्ये किरकोळ वादातून पेट्रोल ओतून एकाला पेटवले

किरकोळ वादातून औरंगाबादेतील विश्रांतीनगर भागात एका व्यक्तीच्या अंगावर तिघांनी पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.23) सायंकाळी घडली. या घटनेनंतर पेटवून देणारे पसार झाले असून, भाजलेल्या व्यक्तीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शेषेराव दगडू शेंगुळे (वय 54, रा. जयभवानीनगर) असे गंभीर भाजलेल्याचे नाव आहे.

‘रॉ’ चा अधिकारी सांगत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्याला अटक

देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या रॉ चा अधिकारी असल्याच्या थापा मारून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या चोरट्याला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आयपीएस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र जप्त केले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली. अभिजित पानसरे असे या चोरट्याचे नाव असून तो मूळचा नाशिकचा आहे.

मला शेतकऱ्यांना चिंतामुक्त करायचंय – उद्धव ठाकरे

औरंगाबाद प्रतिनिधी । शेतकऱ्यांना कर्जमुक्त मी नक्कीच करणार, पण कर्जमुक्त झाल्यानंतर त्याला मला चिंतामुक्त करायचं आहे असे विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केले. ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो-२०२०’ येथे आज मुख्यमंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो,तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या आणि असं जर झालं तर मराठवाडा, महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थान … Read more

जीवनातील अपयशाला कंटाळून शासकीय रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या

औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयातील डॉक्टराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शषाद्री गौडा असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांचे नाव आहे. घाटी रुग्णालयात ते मेडिसिन विभागात साह्ययक प्राध्यापक पदावर कार्यरत होते. गौडा यांनी बेगमपुरा येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ मराठवाडा विद्यापीठात मानवी साखळी

देशातील विद्यापीठ ही आंदोलनाची केंद्र का बनलीत याचा विचार करणं सध्या गरजेचं बनलं आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामीया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन विरोध झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी चेहरे झाकलेल्या गुंडांकडून जेएनयूमधील विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात येत असून औरंगाबादमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थांनी मानवी साखळी करीत निषेध रॅली काढली.

अब्दुल सत्तारांचा राजीनामा ही अफवा, शिवसेना नेत्याचे स्पष्टीकरण

औरंगाबाद प्रतिनिधी | शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या. हे वृत्त समजल्यानंतर सत्तारांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर प्रयत्नशील होते. यावेळी अब्दुल सत्तारांचा राजीनामा ही अफवा असल्याचे सांगत खोतकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सत्तार यांना भेटण्यासाठी ते हॉटेल अतिथीमध्ये गेले असता वेगळ्याच गोष्टी … Read more