आंबागोळीपेक्षाही कोबी स्वस्त, दोन किलोचा गड्डा दोन रूपयांत ; शेतकऱ्यांकडून कोबीचे फुकट वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कमी कालावधीत जादा पैसे मिळतात, या आशेवर अलीकडे शेतकरी भाजीपाल्याच्या, पालेभाज्यांच्या पिकाकडे वळले आहेत. मात्र, त्या पिकांचे दर हे बाजारपेठेत मालाची आवक किती होते, यावर अवलंबून राहत आहेत. सध्या बाजारपेठेत भाज्यांचे दर गडगडले आहेत. त्यात कोबीचा दर तर एक रुपया किलोवर आला आहे. बाजारातील हा दर आंबागोळी आणि चॉकलेट पेक्षाही … Read more

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लबाड; वीज बिलावरून बळीराजा शेतकरी संघटनेची टीका

Uddhav Thackarey

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेले वर्षभरात राज्यातील शेतकरी कोरोनामुळे उध्दवस्त झालेला आहे. अशा काळात सरकार चुकीच्या पध्दतीने भरमसाठ व्याज लावून वीज बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लुट करीत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे शब्दाला पक्के होते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री हे लबाड असल्याची टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सांगितले. कराड येथे बळीराजा शेतकरी … Read more

उंडाळे येथे १८ तारखेला स्वातंत्र्यसैनिकांचा मेळावा ; स्वा.सै. दादासाहेब उंडाळकर पुण्यतिथी निमित्त आयोजन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड | थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या ४७ व्या पुण्यतिथी दिनानिमित 18 फेब्रुवारीस स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा होणार असल्याची माहिती दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त, जि.प.सदस्य अॅड उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्मारक समितीचे विश्वस्त माजी प्राचार्य गणपतराव कणसे,प्रा.धनाजीराव काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.माहिती देताना, उदयसिंह … Read more

कराडच्या गटारीच्या पाण्याने कार्वेत अतीसाराची लागण ; प्रांताधिकाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांना कार्यवाहीची नोटीस

कराड | कऱाड शहरातील वाढीव हद्दीतील माने वस्ती येथील गटरातील पाणी नदी पात्रात मिसळत आहेत. ते पाणी त्वरीत थांबवावे, संबधितांवार पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे त्वरीत कारवाई करून अहवाल सादर करावा, अशी नोटीस प्रातांधिकारी उत्तम दीघे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांता डाके यांना दिली आहे. कार्वे भागात अतीसाराचे रूग्ण आढलले आहेत. ती अतीसाराची लागण वाढीव हद्दीत गोळेश्वर लगतच्या … Read more

कराड नगरपालिका भाजपा स्वबळावर सर्वच जागा लढविणार – भाजप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कमळाच्या चिन्हावर सर्वच्या सर्व 29 जागा स्वबळावर लढविणार असल्याचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी जाहीर केले आहे. कराड येथील शासकीय विश्रामगृहात बूथ अध्यक्ष व शक्ती केंद्रप्रमुख यांचे बूथ संपर्क अभियान घेतले होते. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांना माहीती दिली.यावेळी मुकुंद चरेगांवकर, उमेश शिंदे, प्रमोद शिंदे,रूपेश मुळे … Read more

राष्ट्रीयकृत बँकांना टाळे ठोकण्याचा इशारा; सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देण्यास बँकाकडून टाळाटाळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सुशिक्षित बेरोजगारांना सरकार अनेक योजना घेवून येत आहे, मात्र राष्ट्रीयकृत बँका या सुशिक्षित बेरोजगार असणार्‍यांची हेळसांड करत असून कर्जपुरवठा करण्यास टाळाटाळ करत आहे. राष्ट्रीयकृत बँकाच्या या चुकीच्या भूमिकेविरोधात यापुढे राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेकडून टाळे ठोकण्यात येणार असल्याचे संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी इशारा दिला आहे. कराड … Read more

गावठी 10 तरुण मराठा आरक्षणासाठी उपोषणाला; पाटण तालुक्यात नरेंद्र पाटीलांचे आवाहन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाकडून मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल स्थगिती उठत नाही आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पाटण तालुक्यातील मराठा तरुण मुले तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत, प्रत्येक गावातील कमीत कमी 10 तरुण किंवा त्यापेक्षा जास्त तरुण त्याठिकाणी उपोषणाला 10 … Read more

विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही ; मराठा आरक्षणावरून नरेंद्र पाटील संतापले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड:- राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असताना याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप कडून सतत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही अस … Read more

गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना बस स्टँडवर अटक; LCB ची कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सुर्ली, ता. कराड येथील बस स्टॉपवर एकजण गावठी पिस्तूल बाळगून असणार्‍या एकास सातारा एलसीबीच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून गावठी पिस्टल व 3 जीवंत काडतुसे असा 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच त्याच्याकडे ज्याने पिस्टल ठेवण्यास दिले तोही गंभीर गुन्ह्यात फरार असल्याचे समजले. त्यानंतर दुसर्‍या संशयितासही वांगी, जि. सांगली येथून … Read more

शेती कशी करायची हे तर याला माहीती आहे का? पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नीचा मोदी सरकारवर हल्लाबोल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृषी कायद्याच्या विरोधात आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जात आहे. कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांनी रास्तारोको करत कृषी कायद्यांविरोधात आपला निषेध नोंदवला. शेती कशी करायची हे तर याला माहीती आहे का? असा सवाल करत चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे … Read more