कराडच्या गटारीच्या पाण्याने कार्वेत अतीसाराची लागण ; प्रांताधिकाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांना कार्यवाहीची नोटीस

कराड | कऱाड शहरातील वाढीव हद्दीतील माने वस्ती येथील गटरातील पाणी नदी पात्रात मिसळत आहेत. ते पाणी त्वरीत थांबवावे, संबधितांवार पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे त्वरीत कारवाई करून अहवाल सादर करावा, अशी नोटीस प्रातांधिकारी उत्तम दीघे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांता डाके यांना दिली आहे. कार्वे भागात अतीसाराचे रूग्ण आढलले आहेत. ती अतीसाराची लागण वाढीव हद्दीत गोळेश्वर लगतच्या माने वस्तीपासून गटराचे पाणी नदी पात्रात मिसळल्याने झाल्याची तक्रार झाली आहे. त्यानुसार प्रातांधिकारी दीघे यंनी नोटीस काढून कारवाईचे आधेश दिले आहेत.

स्वच्छ सर्वेक्षणात कऱ्हाड पालिकेने देशात एक लाख लोकसंख्येच्या पालिकात सलग दोन वर्षे पहिला क्रमांक पटकवला आहे. त्या पार्श्वभुमीवर प्रांताधिकारी दीघे यांनी पालिकेस काढलेली नाटीस अधिक गंभीर आहे. परवापासून कार्वे परिसरात अतीसाराचे रूग्ण आढळे आहेत. त्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र ती साथ वाढत आहे. त्याला कऱ्हाड शहरातील गटारीचे पाणी कारणीभूत आहे. त्याबाबत प्रांताधिकारी दीघे यांच्याकडे तशा तक्रारी गेल्या. त्यानुसार काल प्रातांदिकारी दीघे यांनी प्रत्यक्षात माने वस्ती येथे जावून पहाणी केली. त्यावेळी त्यांनी वस्तूस्थिती समोर आली. त्यामुळे प्रांताधिकारी दीघे यांनी पालिकेस नोटीस काढली असून त्या संबधितांवर आरोग्य विभागातर्फे कारावाई करून त्याचा अहवाल द्यावा, असे नोटीसत म्हटले आहे.

प्रांताधिकारी दीघे यांनी दिलेल्या नोटीशीत म्हटले आही की, पालिकेच्या गोळेश्वर नजीकच्या पालिकेच्या हद्दीतील माने वस्ती येथे गटाराचे दूषीत पाणी नदी पात्रात मिसळत आहे. त्यामुळे कार्वे येथील नळ पाणी पुरवटा योजनेस दूषीत पाणी पुरवठा होतो आहे. त्यामुळे कार्वे गावात अथीसाराचे काही रूग्ण आढळले आहेत. त्या अतीसाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यात नाकारता येत नाही. तो प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी कऱ्हाड पालिकेने आरोग्य विभागातर्फे दूषीच पाणी मिसळत आहे. त्या भागाची पहाणी करून तेथे तत्काळ कारवाई करावी. त्या कार्यवाहीचा अहवाल त्वरीत सादर करावी.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like