काँग्रेस-राष्ट्रवादीनं शिवसेनेची साथ सोडल्यास आम्ही साथ देऊ- सुधीर मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मु्स्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेवर दबाव आणल्यास  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप साथ देईल, असं जाहीर वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. आज माध्यमांशी बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी मुस्लिम आरक्षणाला विरोध दर्शविला. धर्माच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या आरक्षणाला भाजपचा विरोध आहे. संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण … Read more

दिल्ली हिंसाचार: काँग्रेस नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, अमित शहांना पदावरून हटवण्याची केली मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचाराबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन सादर करून आपला निषेध नोंदविला आहे. राष्ट्रपतींना निवेदन दिल्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या , ”आम्ही नागरिकांचे जीवन, स्वातंत्र्य आणि संपत्ती सुरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे.” यासह दिल्लीतील हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी … Read more

काँग्रेस शिष्टमंडळाच्या मागणीनंतर हसन मुश्रीफांनी दिले मागासवर्गीय शिक्षक भरतीचे निर्देश

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागासवर्गीय शिक्षक भरती प्रश्नी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भरती कृती समितीने आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी मुश्रीफ यांनी शिक्षक भरती तात्काळ करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. शिक्षक भरतीसाठी डिसेंबर २०१७ मध्ये परीक्षा होऊन मार्च २०१८ … Read more

भारतात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? प्रियांका गांधींचा केंद्राला सवाल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भारत आता लोकशाही देश राहिला आहे का ? अशी विचारणा करत केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे. याबाबतचे एक ट्विट प्रियंका गांधी यांनी करत केंद्र सरकारच्या जम्मू-काश्मीरबाबतच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की,”गेल्या सहा महिन्यांपासून जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना […]

‘महात्मा गांधींबद्दल वाईट बोलणारे रावणाची अवलाद!’- अधीर रंजन चौधरी

महात्मा गांधीबद्दल वाईट बोलत आहेत, ते रावणाची अवलाद आहेत, रामाच्या भक्ताचा ते अपमान करत आहेत. असा आरोप लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी माजी केंद्रीय मंत्री व भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांच्यावर केला आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशात दरम्यान मंगळवारी लोकसभेत माजी केंद्रीय मंत्री व भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अधीर रंजन चौधरी भडकले.

ज्यांची संस्कृती कट्टा ठेवणाऱ्यांची आहे अशांना सत्याग्रह कसा कळणार? काँग्रेसची भाजपवर टीका

माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधींबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. “महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होतं. अशा लोकांना भारतात महात्मा कसं काय संबोधलं जातं?” असा प्रश्न उपस्थित करत हेगडे यांनी गांधींच्या एकूण स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर टीका केली.

राहुल गांधी पुन्हा होणार काँग्रेस अध्यक्ष; रिलॉन्चसाठी काँग्रेसची टीम लागली कामाला

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी घेत पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणार असल्याची वृत्त वृत्त ‘इकॉनॉमिक टाईम्स’या वृत्तपत्रानं दिलं आहे. राहुल गांधींना रिलॉन्च करण्यासाठी त्यांच्या सल्लागारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

.. तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू- अशोक चव्हाण

सोनिया गांधी यांचा तीन पक्षांच्या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. मात्र, सरकार स्थापन करत असताना आम्ही घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान प्रत भेट

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर तणावाचं वातावरण अद्यापही पहायला मिळत आहे. याचीच परिणीती प्रजासत्ताक दिनादिवशीही पाहायला मिळाली. काँग्रेस पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानाची प्रत भेट म्हणून पाठवली आहे. नवी दिल्लीतील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर अ‍ॅमेझॉनवरून संविधानाची प्रत काँग्रेसने भेट म्हणून पाठवली आहे. या प्रतची किंमत १७० रूपये असून पे ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून पाठवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही रक्कम भरावी लागणार आहे.

सत्तावाटपात मिळालेल्या अधिकारांत शरद पवारांचा मास्टरप्लॅन, कार्यकर्त्यांना दिली चतुसुत्री

सामाजिक न्याय विभागात जोमाने काम करु, अल्पभूधारकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध करुन देऊ, महिलांसाठी चांगल्या योजनांची अंमलबजावणी करुया आणि विविध संघटनांचं काम करणाऱ्या लोकांना बळ देऊया असा संदेश शरद पवारांनी दिला आहे.