Saturday, March 25, 2023

ज्यांची संस्कृती कट्टा ठेवणाऱ्यांची आहे अशांना सत्याग्रह कसा कळणार? काँग्रेसची भाजपवर टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधींबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. “महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होतं. अशा लोकांना भारतात महात्मा कसं काय संबोधलं जातं?” असा प्रश्न उपस्थित करत हेगडे यांनी गांधींच्या एकूण स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर टीका केली.

हेगडे यांच्या वादग्रस्त विधानानंतर आता काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हेगडे यांच्या विधानावर तिखट ट्विटरवर प्रतिक्रिया देत लिहलं आहे, ”मोदींच्या भारतात जिथे महात्मा गांधींचे विचार आणि त्यांनी दाखवलेला मार्ग यांवर रोज हल्ला करण्यात येतो आहे.

- Advertisement -

ज्यांना ‘कट्टाग्रह’ म्हणजेच ज्यांची संस्कृती कट्टा ठेवणाऱ्यांची आहे अशांना सत्याग्रह कसा कळणार? असा खोचक प्रश्न विचारात सुरजेवाला यांनी हेगडेंच्या विधानावरून भाजप नैतृत्वाला लक्ष केलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनंतकुमार हेगडेंवर कारवाई करणार का? की हेगडे बोलत आहेत तो मोदींचाच विचार आहे? असा प्रश्न सुरजेवाला यांनी उपस्थित करुन अनंतकुमार हेगडेंच्या गांधींवरील टीकेला प्रतिउत्तर दिलं आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होतं! भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

मुख्यमंत्र्यांची मुलाखत बालिश वाटते; नारायण राणेंची घणाघाती टीका

आमदार प्रशांत बंब यांची खासदार चिखलीकरांना मानहानीची नोटीस; माफी मागा अन्यथा २३ कोटींचा दावा करू