कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे द्विशतक; आत्तापर्यंत 206 जणांना डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 8 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 206 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले असून, कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे द्विशतक पार केले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोरोनाने मोठा हाहाकार निर्माण केला. अगदी पहिल्या … Read more

मुलाच्या निधनानंतर मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे भरणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीचे व्हीव्हीएस लक्ष्मणकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे एखादे चांगले करणार्‍यांची खूप प्रशंसा केली जाते, तर वाईट गोष्टी केल्याबद्दल काहींना ट्रोलही केले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती चांगली कामगिरी करते तेव्हा मोठमोठे स्टार्स सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे कौतुक करतात. या मालिकेत आज भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे भरणाऱ्या मुंबईत … Read more

मुख्यमंत्री मातोश्रीला का राहतात? कोरोना संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच एका मुलाखतीत ‘कोरोनाच्या संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासात राहणंही पसंत नाही. मुख्यमंत्री असूनही ते मातोश्रीला का राहतात?’ असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.  यावेळी त्यांनी ‘उद्धव ठाकरेंनी जो काही राग आहे, तो आमच्यावर काढावा. … Read more

ऑगस्ट २०२१ मध्ये भारत सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष असेल – संयुक्त राष्ट्र 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवडला गेलेला भारत ऑगस्ट २०२१ ला १५ शक्तीशाली देशांच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीच्या अध्यक्षपदी काम करेल अशी माहिती समोर आली आहे. परिषदेचे अध्यक्षपद हे सभासद देशांच्या अद्याक्षरावरून असते. अध्यक्षपद दर महिन्याला नव्या राष्ट्राला दिले जाते. संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली असून पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताचा … Read more

भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधान बनवणार – उद्धव ठाकरे

मुंबई । आज शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. भविष्यातील देशाचा पंतप्रधान शिवसैनिक असेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फेरंसिंगमध्ये शिवसैनिकांना आज मार्गदर्शन केले. यावेळी आपली वाटचाल योग्य दिशेने सुरु असून एक दिवस या … Read more

सलूनवाल्याने ज्याची दाढी केली तो निघाला कोरोना पॉझिटिव्ह; ७० जण क्वारंटाईन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेड झोन मधून आलेल्या एका व्यक्तीची होम क्वारंटाईनमध्ये घरी जाऊन दाढी करणे एका न्हाव्याला महागात पडले आहे. हि घटना सिंहभूम जिल्ह्यातील बागबेडा परिसरातील आहे. जिल्हा प्रशासनाने त्या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. जिल्हा प्रशासनाने सांगितले कि, त्या व्यक्तीने होम क्वारंटाईनच्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे. आणि त्या न्हाव्याला हे माहिती असूनही कि … Read more

सांगली जिल्ह्यात सापडले कोरोनाचे नवे ११ रुग्ण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोनाचे विळखा वाढत असताना बुधवारी आणखी अकरा रुग्णांची नव्याने भर पडली. हॉटस्पॉट बनलेल्या शिराळा तालुक्यात पुन्हा चार जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. किनरेवाडी येथे 35 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, मणदूरमध्ये 70 वर्षीय वृद्धा, तर शिराळ्यात 63 वर्षाचा पुरुष पॉझिटिव्ह आढळला. सांगली शहरात कोरोनाने पुन्हा एंन्ट्री केली असून शंभर … Read more

दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाचे निदान 

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णांची संख्या साडेतीन लाखाच्यावर गेली आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष या युद्धात सहभागी असणाऱ्या अनेकांना कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनादेखील कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. देशातील काही मान्यवरांना कोरोनाचे निदान होत असताना आता दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन … Read more

आता क्रिकेट येणार नव्या स्वरूपात…एकाच सामन्यात ३ संघ खेळणार; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरातील क्रीडा कार्यक्रम बंद झालेले आहेत. तसेच अनेक दिवसांपासून क्रिकेटही बंदच आहे. मात्र आता क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर येते आहे. वेस्ट इंडिजचा संघही इंग्लंडचा करणार आहे. अशातच आता दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट हे नव्या स्वरूपात खेळवले जाणार आहे. २७ जून ला दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्कच्या मैदानावर तीन संघांमध्ये … Read more

सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा! ‘या’ नियमांबाबत होऊ शकतो मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्यासंदर्भात हॉलमार्क च्या नियमांची अंतिम मुदत वाढविण्याची मागणी सराफांनी केली आहे. सोन्याच्या शुद्धतेसाठी भारतात ३ स्टॅण्डर्ड पर्याय पुरेसे नसून कोरोनामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईचा विचार करून देखील पुढच्या वर्षीपर्यंत हॉलमार्किंग ची अंतिम मुदत वाढविण्याची मागणी केली जात आहे. १५ जानेवारी २०२१ पासून देशभरात दागिने आणि आर्टिफॅक्टस च्या सोन्याच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंग अनिवार्य केली जाणार … Read more