तिलारी घाटात बस अपघातात ५ जण जखमी; संरक्षण भीतीमुळं थोडक्यात बचावले प्रवाशांचे जीव

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आगाराच्या कोल्हापूर-पणजी बसला तिलारी घाटात अपघात होऊन पाचजण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने बसमधील ४० प्रवासी सुखरूप बचावले आहेत. कोल्हापूरहून पणजीकडे जात असलेल्या एसटी बसला (एम.एच. 14 बी.टी 3572) तिलारी घाटातील दुसऱ्या अवघड वळणावर अपघात झाला. कागल आगाराची सकाळी कोल्हापूरहून पणजीला जाणारी एसटी बस तिलारी घाटात आली असता … Read more

कोल्हापूरच्या 7 वर्षीय केदार साळुंखेने महिलांवरील अत्याचार थांबवा संदेश देत केले सायकलिंगमध्ये ४ विश्वविक्रम

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर रमणमळा येथील 7 वर्षाच्या विश्वविक्रमवीर केदार विजय साळुंखे याने आज शिवजयंती निमित्त “STOP VIOLENCE AGAINAST WOMEN” (महिलांवरील अत्याचार थांबवा) चा संदेश देत 45 किलोमीटरचे अंतर 105 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे होते ते त्याने 79 मिनटांमध्येच पूर्ण करून स्वतःच्या नावावर 4 विश्वविक्रम नोंदविले. त्याच्या या विक्रमाची नोंद चिल्ड्रन बुक ऑफ रेकॉर्ड (ग्लोबल)यामध्ये … Read more

कागलमध्ये शिवजयंतीनिमित्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी पेटवली शिवज्योत

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्येही शिवजयंती निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे अवघ कागल शहर आज शिवमय झालं होतं. कागल शहरात शिव ज्योतीच आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री राज्याचे हसन मुश्रीफ यांनी पायी अनवाणी चालत शिवज्योत आणली. हसन मुश्रीफही पूर्ण मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी … Read more

कोल्हापूरात करवीर संस्थानाच्या वतीनं छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते शिवजन्मोत्सव सोहळा थाटात साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर राज्यासह संपूर्ण देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आज कोल्हापूरमध्ये टाऊन हॉल परिसरात असलेल्या नर्सरी बागेतील शिवमंदिरात छत्रपती घराण्यामार्फत शिवजयंती साजरी करण्यात आली. करवीर संस्थानच्या वतीने पारंपरिक रितिरिवाजात आज शिवजयंती साजरी करण्यात आली. ऐतिहासिक भवानी मंडप येथून शिवाजी महाराजांच्या मुर्तीची पालखीतून पारंपरिक लवाजम्यात नर्सरी बागेतील शिवमंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. … Read more

कोल्हापूरात ७४ वर्षीय विद्यार्थी देतो आहे १२वीची परीक्षा; न खचता परीक्षा देण्याची ही दुसरी टर्म

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर जो सफर की शुरुआत करते हैं, वो मंज़िल को पार करते हैं, एक बार चलने का होंसला तो रखो, मुसाफिरों का तो रस्ते भी इंतज़ार करते हैं… ही वाक्य कोल्हापूरच्या ७४ वर्षाच्या रवींद्र देशिंगे यांना तंतोतंत लागू पडतात. त्याच कारण असं कि, प्रत्येकाच्या आयुष्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षांना मोठे महत्व … Read more

कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिसांनी पंढरपूरातून जप्त केला ५ लाखांचा गांजा; २ तस्करांना अटक

कोल्हापूर प्रतिनीधी । सतेज औंधकर कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिसांनी गांजा तस्करीचा तपास करताना पंढरपूर मधून एका संशयिताच्या घरातून २१ किलो ७७० ग्रॅम गांजा जप्त केला. बाजारात या जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे ५ लाख १० हजार ७५० रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी राजारामपुरी पोलिसांनी मंजुनाथ फरिरप्पा मंडगोडली आणि अमित देवमारे या … Read more

गावातील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटवण्यासाठी शिवभक्ताचे शोले स्टाईल आंदोलन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी एका शिवभक्ताने टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. नूल येथील रहिवाशी असलेल्या सागर मांजरे हा युवक जवळपास दोन तासांपेक्षा अधिक काळ या टॉवर वरती चढून बसला होता. येत्या १९ फेब्रुवारीला सर्व शिवभक्तांनी … Read more

कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरण: संशयित आरोपींनी हत्यार मुंबईच्या खाडीत टाकली; पोलीस तपासात माहिती उघड

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हस्तेला पाच वर्षे झाली तरी अद्याप खरे मारेकरी सापडत नसल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून कोल्हापूरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचाच भाग म्हणून सकाळी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. तसेच त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांची भेट घेऊन पानसरे हत्या प्रकरणातील खऱ्या मारेकऱ्यांना अटक … Read more

‘एनएसडी’च्या धर्तीवर ‘महाराष्ट्र स्कुल ऑफ ड्रामा'(एमएसडी)नाट्य अभ्यासक्रम सुरू करणार- राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर चित्रनगरीचा दर्जा उन्नत करून चित्रीकरणासाठी अधिकाधीक प्रतिसाद मिळावा याकरिता पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी सूचना सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. विधानभवनामध्ये झालेल्या राज्यमंत्री पाटील यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या बैठकीत त्यांनी ह्या सूचना केल्या. यावेळी राज्यमंत्री पाटील म्हणाले, ”मराठी चित्रपटसृष्टीसाठी कोल्हापूरची चित्रनगरी महत्वपूर्ण ठरत आहे. याठिकाणी अनेक नामवंत … Read more

कुडणूर ते कोकळे रस्ता डांबरी करा! सरपंच अमोल पांढरे यांची जिल्हा नियोजन समितीकडे मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातील कुडणूर हे गांव जत आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे या गावचे प्रश्नं सोडविताना प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यातच कुडणूर – कोकळे रस्त्याचा प्रश्नं गेली अनेक वर्षे भिजत पडला आहे. या कच्च्या रस्त्याचे पक्क्या रस्त्यात रुपांतर करुन हा रस्ता डांबरी रस्ता करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने केली … Read more