कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुस्लिमांचे मृतदेह श्रीलंकेत जाळले जातायत, मुस्लिम धार्मिक नेते म्हणाले हे तर इस्लामविरूद्ध..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । श्रीलंकेतील मुस्लिम धार्मिक नेत्यांनी कोरोना व्हायरसमुळे प्राण गमावलेल्या मुस्लिमांच्या अंत्यसंस्काराबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.या मुस्लिम धर्मगुरूंचे असे म्हणणे आहे की सुधारित नियम हा इस्लामिक परंपरेच्या विरोधात असून आम्ही सरकारच्या या निर्णयाशी सहमत नाही आहोत. विशेष म्हणजे, श्रीलंकेने देशातील मुस्लिमांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून अंत्यसंस्कारावेळी कोरोनामुळे मृत पावलेल्यांना जाळणे हे सक्तीचे … Read more

मंदिरात पूजा करणार्‍या भाजप नेत्याला केरळ मध्ये अटक; लाॅकडाऊनच्या उल्लंघनाचा ठपका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाउन लागू केलेला आहे तसेच सरकारने सर्व प्रकारच्या सभांनादेखील बंदी घातलेली आहे. दरम्यान, केरळमधील सार्वजनिक ठिकाणी गर्दी रोखण्यासाठी लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप नेते आणि मंदिरप्रमुखांसह पाच जणांना नुकतेच अटक करण्यात आली आहे. मंदिरातील धार्मिक विधीवेळी मंदिर प्रमुखांनी जमाव गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एरुमापट्टी पोलिसांनी … Read more

बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीची पुन्हा सरावास सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला बऱ्याच दिवसानंतर फुटबॉलचा सराव करताना पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंददायक भावना होती. शुक्रवारी स्पॅनिश लीगमधील इतर काही खेळाडूंसह त्याने खासगी सराव सत्रात भाग घेतला. कोविड -१९ या साथीच्या रोगामुळे स्पेनमधील लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडू जवळजवळ दोन महिने ग्राउंडवर उतरू शकलेले नाहीत. खेळाडूंचा सराव सुरू होणे म्हणजे देशांतर्गत … Read more

कोरोना संदर्भात रशियन सरकारवर टीका करणारे तीन डॉक्टर पडले रहस्यमय अपघातांना बळी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियामध्ये अचानक कोरोना विषाणूची प्रकरणे वाढली आहेत, ज्यामुळे वैद्यकीय कर्मचार्‍यांची अवस्था आणखी बिकट झालेली आहे.इथे रूग्णांची तपासणी करण्यासाठीही वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नाहीत. यानिमित्ताने डॉक्टर सतत सरकारवर टीका करीत असून या टीकेच्या बदल्यात त्यांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन आठवड्यांत रशियातील ३ डॉक्टर हे रुग्णालयाच्या खिडकीतून खाली पडले आहेत, त्यातील … Read more

दारुची दुकाने सुरु झाल्यानिमित्त ठेवली पार्टी अन् मित्राचा चाकू घुपसून केला खून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमध्ये कोविड -१९मुळे लॉकडाउन सुरु करण्यात आला होता. यावेळी लावण्यात आलेल्या निर्बंधांवरील शिथिलतेमुळे दारूची विक्री सुरू झाल्यानंतर दारूमुले झालेल्या भांडणात दोन जण ठार झालेत.तर दुसर्‍या एका घटनेत एक महिला आरोग्य कर्मचारी आणि तिचा नवरा हे या हल्ल्यात जखमी झालले आहेत. मंगळवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. दारूची दुकाने उघडल्याच्या आनंदात पार्टी दिली … Read more

रशियामध्ये कोरोनाचा हाहाकार;गेल्या २४ तासांत १०,००० पेक्षा जास्त नवीन संसर्गाची नोंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी रशियामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची १०,००० पेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदली गेली.यासह,या देशात प्रथमच कोविड -१९ रूग्णांच्या संख्येत एका दिवसात पाच अंकी वाढ झाली आहे.येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की १०,६३३ नोंदवलेल्या एकूण प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे हि मॉस्कोमधून समोर आलेली आहेत.यामुळे मॉस्कोची वैद्यकीय सुविधा बिघडण्याच्या शक्यतेत वाढ झाली आहे.उल्लेखनीय हे आहे की … Read more

प्रार्थनेचा कोरोना विषाणूच्या रुग्णांवर सकारात्मक परिणाम होतो ? अमेरिकेत याबाबत संशोधन सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या कॅनसास शहरातील भारतीय वंशाचे-अमेरिकन चिकित्सकाने “बचावासाठी प्रार्थना” यासारखे काहीतरी करून कोरोना विषाणूमुळे संक्रमित लोकांना बरे करण्यास उपयोग होऊ शकतो किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे.मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन फिजीशियन धनंजय लकीरेड्डी यांनी शुक्रवारी आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना विषाणूच्या १००० रूग्णांचा समावेश असलेल्या ४ महिन्यांच्या प्रार्थना अभ्यासाला शुक्रवारी … Read more

टीम इंडियाचा प्रशिक्षक बनायला आवडेल-शोएब अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशां दरम्यान क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीये.अशा परिस्थितीत केवळ आयसीसीच्या स्पर्धेतच हे दोन्हीही संघ एकमेकांविरूद्ध खेळताना दिसतात.मात्र पाकिस्तानने भारताविरुद्ध मालिका खेळवण्याची अनेकदा मागणी केली आहे,परंतु त्यांच्या या मागणीला बीसीसीआय केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय सहमती देणार नाही. अलीकडेच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने … Read more

मुंबईत देशातील पहिली मोबाईल Covid-19 टेस्टिंग बस! मास स्क्रिनिंगमध्ये होणार मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ११.५ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील या वेगाने वाढणार्‍या कोरोना रुग्णांना पाहता आता मुंबईला पहिली मोबाईल सीओव्हीआयडी -१९ टेस्टिंग बस मिळाली आहे. या बसच्या माध्यमातून मुंबईत अधिकाधिक लोकांची चाचणी होणार … Read more

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या ११ लाख पार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत आतापर्यंत १.१ दशलक्षाहून अधिक लोकांना कोरोनाव्हायरस या साथीच्या आजाराची लागण झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती दिली.सिन्हुआ म्हणाले की, अमेरिकेत कोविड -१९च्या संसर्गाची संख्या शुक्रवारी संध्याकाळी ०७.४० (स्थानिक वेळेनुसार) ११ लाख ९७ वर पोहचली आहे. ”सिन्हुआ यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजिनियरिंग (सीएसएसई) च्या वतीने … Read more