परभणीकरांना दिलासा! एकमेव कोरोनाबाधितही झाला ठणठणीत

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे राज्यभरात कोरोनाचा थैमान सुरु असताना आता परभणीहून एक दिलासादायक बातमी आली आहे. परभणी जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली असून संपूर्ण जिल्हा करोनामुक्त केल्याबद्दल त्यांनी आरोग्य यंत्रणेचे आभार मानले आहेत. परभणी जिल्हा सुरुवातीपासूनच करोनामुक्त होता. मात्र … Read more

आंतरजिल्हा अपडाऊनसाठी अधिकाऱ्यांना बंदी; परभणी जिल्हाधि-यांचा खबरदारीचा निर्णय

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे नौकरीच्या निमित्ताने जिल्हयातून बाहेर जिल्हयात किंवा बाहेर जिल्हयातून परभणी जिल्हयात येणे -जाणे करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना जिल्हयातून बाहेर जाण्यास व जिल्हयात प्रवेश करण्यास रविवार दि. 3 मे 2020 पर्यंत लागू असलेल्या लॉकडाउन कालावधीत जिल्हा प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी मुगळीकर यांनी जारी केले आहेत. कोरोना (कोव्हीड -19) या … Read more

Breaking | परभणीत सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे राज्यात कोरोनाव्हायरस संसर्ग ग्रीनझोन मध्ये असणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यात लॉक डाउन मधून सवलत देण्याचा विचार चालू असतानाच रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुण्याहून आलेल्या एका २१ वर्षीय तरुणाला लक्षणे आढळल्याने त्याचे विलगीकरण करत ,स्वॅब ची तपासणी करण्यात आली होती.संबंधित युवकाला आता शासकीय रुग्णालयात दाखल … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ५० हजार रुपयांची मदत; सेवानिवृत्त ना. तहसीलदारांचा पुढाकार

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासन व प्रशासन कसोटीचे प्रयत्न करत आहे .त्यात राज्यात दोन हजार कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत .त्यामुळे आरोग्य विभागावर ताण आलाय .कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लॉक डाऊन असल्याने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात राज्य शासनाच्या तिजोरीवरही ताण पडणार आहे .या लढ्यामध्ये … Read more

कोरोनासंदर्भात अफवा आणि धार्मिक तेढ|परभणीत पाच गुन्हे दाखल; एकास अटक

धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश सोशल मीडियावर पसरवल्याने परभणीत 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीत गरजू कुटुंबांना जेवणाची पॅकेट पुरवली; वरपुडकर परिवाराचा स्तुत्य उपक्रम

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जिल्ह्यातील राजकारणात वेगळं स्थान व उंची असणाऱ्या वरपुडकर कुटुंबांने लॉकडाऊनच्या कठीण काळात सामाजीक बांधिलकी जोपासत गरजु लोकांना मदतीचा हात पुढे केला असुन चार तालुक्यात अन्न पुरवण्याची स्तुत्य व्यवस्था केली आहे. यावेळी पहिल्या दिवशी १५०० अन्नपाकीटांचे वाटप करण्यात आले आहे . मागच्या सहा दिवसापासून जगभर आरोग्य संकट होत, थैमान घातलेल्या कोव्हीड-१९ … Read more

परभणीतील 9 संशयीत रुग्णांचे स्वॅब राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणीकरांसाठी दिलासादायक बातमी असून अद्याप पर्यंत जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या संशयित रुग्णांमध्ये एकाही रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले नसल्याने अजून तरी जिल्ह्यात कोरोणा रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांना बळी पडू नये व काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोना विषाणू संदर्भात जिल्हा रुग्णालयात एकूण … Read more

गावात येऊ नका, गावातून जाऊ नका! रायपूर वासियांचा कडेकोट लॉकडाऊन

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशभरामध्ये लॉक डाऊन करण्यात आले. प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून हे सर्व केले जात आहे. यादरम्यान हे सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी केले जात असताना काहीजण मुद्दामून किंवा अनावधानाने याचं पालन करत नाहीयेत .त्यामुळे या विषाणूची बाधा होण्याची शक्यता वाढली आहे .पण काही लोक असेही … Read more

परभणीत जिल्हा रुग्णालयात ७४ संशयीत रुग्ण, अद्याप एकही रुग्ण पोझिटिव्ह नाही

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी येथील जिल्हा रुग्णालयात ७४ संशयीत रुग्णांची नोंद झाली असून एकुण घेण्यात आलेले स्वॅब ५७ व त्या पैकी ३१ निगेटिव्ह असुन १७ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. (९ स्वॅब रिजेक्टेड आहेत ) त्या पैकी ४५ परदेशातून आलेले व त्यांच्या सहवासातील व देशातंर्गत ४ असे एकुण ४९ नागरिक निगरानीखाली आहेत. जिल्ह्यात आज … Read more

शुभमंगल नाही कोरोना सावधान ! विवाह सोहळे रद्द

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे सध्या जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी  सावधानता व बचाव हाच इलाज असल्याने, या घातक आजारापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये व यातून रोग प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेतल्या जात आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार, यात्रा, … Read more