बाप लेकीच्या नात्याला काळिमा
बाप लेकीच्या नात्याला जगात तोड नाही असे आपण म्हणतो परंतु काही नराधमांमुळे या पवित्र नात्याला काळिमा फसला जातोय. समाजातील विकृत मानसिकतेच्या वाढत्या पेवामुळे बलात्कार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडलीय. एका नराधम बापानेच आपल्या ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून, या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.