राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही; पंकजा मुंडेंनी पराभव स्वीकारला

बीड | जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज होत आहे. यापूर्वीच पंकजा मुंडे यांनी ट्विट करून या निवडणुकीवर भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांनी म्हंटले की, राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे. रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत. … Read more

आप्पा… गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिवशी धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट

बीड | भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मोठा मेळावा होणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केलं आहे. त्याचवेळी गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करुन आपले आप्पा अर्थात गोपीनाथ काकांच्या आठवणी जागवल्या आहेत. ‘आप्पा, तुमचाच वारसा … Read more

पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर? राज्यात राजकीय भुकंपाची शक्यता

विशेष प्रतिनिधी | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना परळी विधानसभा मतदार संघात पराभवाला सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजा यांचे बंधु धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना विधानसभा निवडणुकीत धुळ चारली होती. त्यानंतर पंकजा यांनी पराभव मान्य करत पक्षाच्या मिटींगला हजेरी लावणे सुरु केले होते. मात्र पंकजा यांच्या पराभवात त्यांच्याच पक्षातील काही बड्या नेत्यांचा … Read more

धनंजय मुंडे सकाळपासून नॉट रिचेबल, अजित पवारांना बळ धनंजय मुंडेंचंच?

मुंबई प्रतिनिधी | राज्याच्या राजकारणाची दशा आणि दिशा मागील महिनाभरात महाराष्ट्रातील जनतेने अनुभवली. निवडणूक प्रचारावेळी तुम्ही कुणाच्याही नादाला लागा पण शरद पवारांच्या नादाला लागू नका असं सांगणाऱ्या धनंजय मुंडे यांनीसुद्धा शनिवारी सकाळी अजित पवारांसोबत शपथविधी कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी केल्यामुळे आता अजित पवार आणि धनंजय … Read more

‘पैसे वाटताना जर कोणी दिसलं तर हातपाय तोडू’- संदीप क्षीरसागर

‘प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा. अन्यथा आम्हाला जर कोणी पैसे वाटताना दिसले तर त्याचे सरळ हातपाय तोडू’ असा इशारा बीड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी दिला. बीड शहरातील खंडेश्वरी मंदिर परिसरात पैसे वाटप करणाऱ्या सुरेश बन्सोडे यांस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावेळी प्रशासनाला दमदाटी करत क्षीरसागर यांनी स्फोटक वक्तव्य केलं.

परळीत घुमला ‘मोदी’ नाद, थकलेल्या नेत्यांना आता घरी बसवा – नरेंद्र मोदी

भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रत्येक कामाला काँग्रेस राष्ट्रवादीने नावं ठेवलीत. आज त्यांना कुणीच विचारत नाही कारण कृती करण्याचं धाडस ते दाखवू शकत नाहीत असं मोदी पुढे म्हणाले.

बीड मधील लढतींचे चित्र स्पष्ट, महायुती मधील गेवराईची बंडखोरी वगळता ‘बंड थंड’

गेवराई वगळता बीड जिल्ह्यात ‘महायुती’मधील सर्व बंडखोर नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे बीड मधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांनी आपली तलवार म्यान केल्यामुळे पाच मतदार संघात दुरंगी लढत होणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. तर गेवराई मतदारसंघात शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. या मतदारसंघात भाजप – राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होईल

राष्ट्रवादीच्या ‘या’ उमेदवाराने केला भाजपात प्रवेश, केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला धक्का

बीड प्रतिनिधी | राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही. ही गळती थांबावी म्हणून डॅमेज कंट्रोल साठी खुद्द शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन जी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यातीलच एक उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनीच राष्ट्रवादीला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. केज विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपकडून उमेदवारी … Read more

हत्या झालेल्या शिक्षकाच्या नातेवाइकाने आत्मदहनाचा केला प्रयत्न

बीड प्रतिनिधी। बीड शहरातील सैनिकी विद्यालयाचे शिक्षक सय्यद सज्जाद यांची गुरुवारी हत्या करण्यात आली. त्यानंतर सज्जाद यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांचे नातेवाईक मोमिन कौसर यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात अंगावर राँकेल ओतुन घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलीस आणि इतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना वेळीच त्यांना पकडल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. लब्बैक युवा मंचच्या माध्यमातून … Read more

शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयात झोपा आंदोलन

बीड प्रतिनिधी। आपण बरीच आंदोलन ऐकली आणि पाहली असतील पण बीडमधील एका आंदोलनाने प्रशासनाची झोप उडवली आहे. यंदा मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारने दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी केज तालुक्यातील अनेक गावच्या हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयात बेमुदत झोपा आंदोलन सुरु केल. एक … Read more