विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे पहिले पाच उमेदवार जाहीर, तरुणांना संधी

बीड प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी बीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात बीड मधील पाच विधानसभांसाठी उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे उमेदवारी देताना तरुण चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. उमेदवारी जाहीर झालेल्यांमध्ये अनुक्रमे बीड मधून संदीप क्षिरसागर, गेवराई मधून विजयसिंह पंडित, केज मधून नमिता मुंदडा, परळी मधून धनंजय मुंडे, तर माजलगाव मधून माजी मंत्री … Read more

दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. असं साकडं घालत गणरायाला निरोप..!

बीड प्रतिनिधी | जिल्ह्यात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येतोय. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झालीये.

परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात असणाऱ्या हरिहर तीर्थ या तलावात शहरातील गणपतीचे विसर्जन करण्यात येतंय. दुष्काळाचं सावट यंदाच्या विसर्जनावर दिसून आले, आज गणेश विसर्जन असल्याने परळी नगर पालिकेकडून टँकरच्या सहाय्याने हा तलाव भरण्यात आलाय.

जिल्ह्यावरील दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. आणि परतीचा पाऊस जोरदार पडू दे.. असं साकडं घालत गणरायाला निरोप देण्यात येतोय. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत गणेश विसर्ज सुरु आहे.

अटल महाआरोग्य शिबिराचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते उद्धाटन

Devendra Fadanvis

धुळे | अमित येवले धुळे येथे आयोजित अटल महाआरोग्य शिबिराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्धाटन झाले. धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयालगतच्या मैदानावर हे शिबिर भरवण्यात आले आहे. जिल्ह्यातील नव्हे तर जिल्ह्यालगत असलेले अमळनेर, पारोळा, मालेगांव, सटाणा या तालुक्यातीलही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या संधीचा लाभ होणार आहे. अटल … Read more

परळीतील मराठा ठिय्या आंदोलन घेणार मागे ?

Thumbnail 1532952410506

परळी | मराठा आरक्षणाची ठिणगी ज्या ठिकाणाहून पेटली त्या परळीतील ठिय्या आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. कारण परळीतील आंदोलकांनी मागणी केल्या प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत लेखी आश्वासन दिले आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या कार्यक्रमाचे लेखी आश्वासन दिल्या शिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी काल मेगा भरती रद्द करत असल्याचे सांगितले … Read more