तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेतेपदी
महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होऊन २४ तासही झालेले नसताना राज्यात सरकार कोण स्थापणार याविषयी वेगवेगळे तर्क लावले जाऊ लागले आहेत. शिवसेनेसोबत बोलणी फसली तर देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करावं लागण्याची नवी शक्यता समोर आली आहे. या परिस्थितीत शिवसेना राष्ट्रवादीच्या थेट तर काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर सरकार स्थापनेवर दावा करू शकते. भाजप-शिवसेना महायुतीचं एकूण बळ १५९ आमदारांचं आहे तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि काही अपक्ष मिळून हे संख्याबळ १७० पर्यंत पोहचत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं ‘मी पुन्हा येणार’ हे वक्तव्य ‘विरोधी’ पक्षनेतेपदासाठी होतं का? याची चर्चा रंग धरू लागली आहे.