जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन ; उद्धव ठाकरेंचा नक्की कोणाला इशारा ??

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडीला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांची अभिनंदन मुलाखत शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून घेतली जात आहे. त्याचा पहिला प्रोमो खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केला आहे. या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत दिसले. जास्त अंगावर याल तर मी हात धुवून … Read more

हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकार नाकर्तेपणा दाखवत आहे, आम्ही विरोधी पक्षात काम करत आहोत. मात्र, तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच आगामी काळात मनसेला सोबत घेणार नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या … Read more

स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील ; दानवेंच्या ‘त्या’ विधानाला राऊतांचं प्रत्युत्तर

Sanjay Raut and Danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पुढील दोन तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल, असा दावा केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीचं सरकार देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार असून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल … Read more

महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा – अण्णा हजारे

Anna Hazare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत आघाडी करून स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला या महिन्याच्या अखेरीस एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर … Read more

पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता? ; मनसेचा राज्य सरकारला संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  राज्यात मंदिरे सुरू करण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील विरोधक याच मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता मनसेनेही उडी मारली आहे. पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता?; असा सवाल उपस्थित करून मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच कोरोना … Read more

कोपराला गूळ लावायचा आणि हाताला चाटायचा अशी राज्य सरकारची शेतकऱ्यांना मदत – सदाभाऊंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

sadabhau

कराड । कोरोनाच्या काळात शेतकरी हा पूर्णपणे होरपळून निघालेला आहे. यावर्षीची शेतकऱ्यांची दिवाळी ही कडू दिवाळी म्हणून साजरी होत आहे. सरकारने १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजची विल्हेवाट बघितली तर ग्रामीण रस्ते, पाटबंधारे, पाणीपुरवठा विभाग या सर्वांना निधी विभागून दिला आणि त्यातून शेतकऱ्यांच्या वाट्याला केवळ ५ हजार कोटी येतील. कोपराला गूळ लावायचा … Read more

महाविकास आघाडी सरकार सुडबुध्दीने प्रत्येक गोष्ट करते – सदाभाऊ खोत यांचा आरोप

sadabhau

कराड | मिडीयामधला किंवा सामाजिक क्षेत्रातील एखादी व्यक्ती तुमच्या वर्मावर बोट ठेवून बोलत असेल तर त्याच तोंड बंद ठेवण्यासाठी जुनं प्रकरण काढून तुम्ही त्याला अटक केली. तुम्हांला अटक करायची होती तर एक वर्षे का थांबला? असा सवाल करत हे सरकार सूडबुद्धीने प्रत्येक गोष्ट करण्याच्या दृष्टीकोनातुन भूमिका बजावत आहे. असा आरोप सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर … Read more

अजून किती जणांचा गळा दाबणार ?? ; अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर कंगणाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

kangana and uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिकन टिव्हीचे संस्थापक अर्णब गोस्वामी याना अन्वेय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी अर्णब यांना वरळी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. कलम ३०६ अंतर्गत अर्णबवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. याबाबत कंगनानं … Read more

विकास प्रकल्प लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे हीच तिघाडीच्या ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती ; आशिष शेलारांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरे येथील मेट्रो कारशेड कंजूरमार्गला हलवल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार मध्ये वाद निर्माण झाला आहे. मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे. त्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केला आहे. लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे असा तिघाडीच्या ठाकरे सरकारचा कारभार असल्याचा आरोप भाजप आमदार … Read more

वाढीव वीजबिलांबाबत जनतेला दिवाळीपर्यंत गोड बातमी – ऊर्जामंत्री नितीन राऊत

Nitin Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला वाढीव वीजबिल आले होते. यासंदर्भात जनतेला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे. वाढीव वीजबिलांबाबतीत येत्या दिवाळीपर्यंत नागरिकांना लवकरच गोड बातमी मिळेल,” असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. “0 ते 100 युनिटपर्यत वीज फ्री देण्याबाबत मी ऊर्जामंत्री म्हणून सांगितलं आहे. मात्र त्यावर अर्थमंत्री … Read more