महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून शिवसेनेची काँग्रेसकडे दिलगिरी

मुंबई । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल महाविकास आघाडीत पुन्हा एकदा … Read more

महाविकास आघाडीच्या सत्तेत दलितांवरील अत्याचारात वाढ- रामदास आठवले

मुंबई । केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलितांवरील हल्ल्यात वाढ झाल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. याविरोधात रिपब्लिकन पक्षातर्फे ११ जुलै रोजी देशभरात आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही आठवले यांनी केली. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी म्हटले … Read more

मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते – चंद्रकांत पाटील 

मुंबई । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोरोना काळात सरकार किती निष्क्रिय आहे हे सांगण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आता त्यांनी परत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला मदत मागण्यासाठी त्यांचा इगो आडवा येतो असे वक्तव्य केले आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या … Read more

मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळालं- राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई । राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन ६ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, सरकारमधील सहभागीदार असलेला काँग्रेस पक्ष नाराज असल्याची वृत्त समोर आलं होत. यानंतर सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळावं अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. यावरून भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. … Read more

कमराबंद चर्चेनंतर बंटी पाटील, अमित देशमुख पृथ्वीराज बाबांना घेऊन मुंबईकडे रवाना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी मंत्री अमित विलासराव देशमुख व मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची कमरबंद चर्चा झाली. मात्र या राजकीय कमराबंद चर्चेची राज्यभर मोठी चर्चा सुरू आहे. यानंतर आता तिनही नेते मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या … Read more

.. तर राज्य सरकारचा पाठिंबा काढावा! रामदास आठवलेंचा काळजीपोटी काँग्रेसला सल्ला

मुंबई । काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. मात्र निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही. तसं असेल तर काँग्रेसनं राज्य सरकारचा पाठिंबा काढावा,’ असा सल्ला रिपब्लिकन नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला दिला आहे. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर … Read more

सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान द्या! काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची आज मुंबईमध्ये बैठक पार पडली. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर ‘काही प्रश्न नक्कीच आहेत. सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला … Read more

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खादेपालट होणार; पृथ्वीराज चव्हाणांकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी तर पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद?

नवी दिल्ली | महाराष्ट्रात कोरोना संकटकाळातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या राज्यपालांच्या भेटीगाठी सुरु असताना, तिकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा आहे. नाना पटोले यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून हॅलो महाराष्ट्रला समजली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात राजकिय घडामोडींना वेग आला आहे. … Read more

मी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी महाविकास आघाडीला अनेक बैठका घ्याव्या लागतील – फडणवीस 

मुंबई । विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काळ केंद्राने राज्याला २ लाख ७०, हजार रुपये दिल्याचा दावा केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही  माहिती दिली होती. ही  माहिती देत असताना त्यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तरे दिली होती. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण … Read more

झोपलेल्या मंत्र्यांना माजी कृषी मंत्री अनिल बोंडेनीं पाठवली कापसाची गादी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई | कोरोनाच्या या काळात राज्य सरकार पार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, कापूस खरेदी बंद आहे, आता पेरणीला काही दिवसात सुरवात होणार आहे, मात्र महाविकास आघाडीचे सरकार झोपी गेले आहे असा आरोप करत राज्याचे माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन … Read more