२४ तासात महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक १२३ मृत्यूंची नोंद 

वृत्तसंस्था । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेच पण आज गेल्या २४ तासात राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंदही झाली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत मात्र तेवढेच रुग्ण बरेही होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र आज राज्यात १२३ हा सर्वाधिक मृत्यूचा आकडा पाहण्यात आला आहे. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने आज जाहीर … Read more

महाराष्ट्राच्या लाॅकडाउन नियमावलीत मुख्यमंत्री ठाकरेंकडून सुधारणा; ‘हे’ आहेत नवीन नियम

मुंबई । केंद्र सरकारने १ जूनपासून संचारबंदीचा पाचवा टप्पा जाहीर केला आहे. सोबत काही नियम शिथिल केले आहेत. तसेच राज्यांना त्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने आज या नियमांमध्ये सुधारणा करीत ते जाहीर केले आहेत. सुधारित नियमांमध्ये शारीरिक बाह्य क्रियाकलापांना परवानगी असलेली दुकाने उघडणे, खाजगी कार्यालये पुन्हा सुरू करणे, वर्तमानपत्र विक्री, शैक्षणिक संस्थांच्या कर्मचार्‍यांची उपस्थिती, … Read more

अर्थमंत्र्यांनी येणाऱ्या अधिवेशनात संसदेत पुरवणी अर्थसंकल्प मांडावा – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आता निरर्थक झाला असल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून तसे सांगत पुरवणी अंदाजपत्रक सादर करण्याची मागणी केली आहे. नवीन कर आकारणी, कर्ज योजना आणि सुधारित खर्चाचा समावेश करून अर्थमंत्र्यांनी जून महिन्यात एक … Read more

केरळमधील हत्तीणीच्या हत्येवरून निलेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशाचे राजकारण एकीकडे आणि महाराष्ट्राचे राजकारण एकीकडे आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना राज्यात राजकारणाचाही वेगळाच खेळ सुरु आहे. सतत आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी हे जणू महाराष्ट्राला आता रोजचेच झाले आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून सतत कार्यरत असणारे निलेश राणे आता त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून पुन्हा एकदा बोलले आहेत. सध्या अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांचे … Read more

पुणेकरांनो लाॅकडाउनमध्ये घरमालकांवर गुन्हे दाखल करताय? हे वाचा

पुणे । कोरोना संसर्गामुळे देशव्यापी संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे देशातील अनेक उद्योग व्यवसाय बंद होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भाडेतत्वावर राहणाऱ्या लोकांना सूट दिली होती. मात्र आता घरमालकांनी थकीत भाड्यासाठी मागणी सुरु केली आहे. यावरून मालक व भाडेकरू यांच्यामध्ये वाद होत आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील हे वाद सामंजस्याने सोडविण्याची गरज असल्याचे असोसिएशन … Read more

आम्ही ठाकरे सरकारच्या सोबत; अरविंद केजरीवाल यांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यात आधीच कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच महाराष्ट्र गेल्या २ दिवसांपासून निसर्ग चक्रीवादळाच्या भीतीच्या छायेखाली आहे. आता हे वादळ महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर धडकून उत्तरेकडे सरकत आहे. महाराष्ट्रात या चक्रीवादळामुळे नुकसान होते आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे ट्विट केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव … Read more

डीजीसीएने विमानातील मधल्या सीटसंदर्भातील नियम बदलले,३ जूनपासून लागू होणार नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सर्व एअरलाइन्स कंपन्यांना आता आपल्या विमानातील मधली सीट प्रवासावेळी रिकामी ठेवावी लागणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेनंतर सिविल एविएशन रेगुलेटरी डीजीसीएने हा निर्णय घेतला आहे. मात्र, यात काही प्रमाणात सूटही देण्यात आली आहे. नव्या गाइडलाइन्समध्ये एअरलाईन्सला आता आपल्या विमानातील मधली सीट रिकामी ठेवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले आहे. जर हे … Read more

सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा; शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरु

मुंबई । भाषिक तत्त्वानुसार मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. या भाषेनेच राज्याला सांस्कृतिक, सामाजिक ओळख निर्माण करून दिली आहे. म्हणून या भाषेचे जतन तसेच विकास करणे ही शासनाची जबाबदारी आहे. यादृष्टीने राज्य शासनाने राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये किमान इयत्ता ८ वी पर्यंत मराठी भाषा अध्यापन व अध्ययन अनिवार्य व्हावे या दिशेने … Read more

‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना आजपासून सुरु, स्थलांतरितांना मिळणार दिलासा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु झाला आहे. ठिकठिकाणचे स्थलांतरित कामगार आपापल्या गावी परतत आहेत.  आहे त्या ठिकाणीच अडकले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील अशा गरीब तसेच स्थलांतरित कामगारांसाठी आशादायक गोष्ट घडली आहे. एक देश एक रेशन कार्ड ही योजना आजपासून देशभरात सर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश याठिकाणी सुरु … Read more