आता ट्रेनमध्ये खाली बर्थसाठी टीटीईच्या मागे हेलपाटे मारण्याची गरज नाही; रेल्वेने सुरू केली ‘ही’ नवीन सेवा
रेल्वेने प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये प्रवास करताना नवी सुविधा सुरु केली आहे. या नवीन सुविधेद्वारे आता तुम्हाला ट्रेनमध्ये कन्फर्म तिकिटे मिळवण्यासाठी मदत मिळणार आहे. या नवीन सुविधेनुसार भारतीय रेल्वेने आरक्षण चार्ट ऑनलाईन पाहण्याची सेवा सुरू केली आहे. आयआरसीटीसी वेबसाइटवर तुम्ही ट्रेनमधील बर्थचे स्टेटस पाहू शकता. पारदर्शकतेला चालना देण्यासाठी, रेल्वे मार्गाने चालू ट्रेनमधील रिक्त जागांविषयीची माहिती आता http://irctc.co.in/online-charts या संकेतस्थळावर प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.