ऑगस्ट पर्यंत चालणार नाही सामान्य ट्रेन? रेल्वे सर्क्यलर मधून मिळाली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या काळात देशातील सर्व लोकांना रेल्वे सुविधा कधी सामान्यपणे सुरु होतील हे जाणून घ्यायचे आहे. कोविड -१९ च्या कारणास्तव जवळपास तीन महिन्यांपासून रखडलेल्या गाड्यांचे कामकाज या क्षणी ती सुरु होणे अपेक्षित नाही, कारण 14 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी बुक केलेल्या सर्व नियमित वेळापत्रकच्या रेल्वेची तिकिटे भारतीय रेल्वेने रद्द केलेली आहेत. … Read more

रेल्वे कर्मचाऱ्याला पाकिस्तानी गुप्तहेराने विचारले ‘हे’ तीन प्रश्न; भारतीय लष्कराच्या हालचालींवर ठेवत होते पाळत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या गुप्तहेरांच्या संपर्कात आलेल्या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबरच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या या दोन्ही गुप्तहेरांनी भारतीय सैन्याच्या हालचालीशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी रेल्वे भवनात सापळा रचला होता, सध्या रेल्वेच्या या दोन्ही कर्मचार्‍यांना चौकशीनंतर सोडण्यात आले आहे. पाकिस्तानी गुप्तहेरांशी कनेक्शन असल्याच्या संबंधात, रेल्वेच्या २ … Read more

करवंदं विकणाऱ्या तिच्या कमनीय देहाची मनस्वी गोष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मे महिन्यातील कडक दूपार होती ती. आमची रेल्वेगाडी कसारा स्टेशनला थांबलेली होती. “डोंगराची काळी मैना…डोंगराची काळी मैना” असं मोठमोठ्याने ओरडत…हातात कसल्याशा टोपल्या घेऊन, काही महीला गाडीच्या प्रत्तेक बोगीच्या खिडकीमधे डोकावून कोणी त्यांची करवंद घेतंय काय ते पाहत होत्या. रेल्वेगाडी स्टेशनावरती येताच लगबगीने हलकेपणाने या बोगीतून त्या बोगीच्या खिडक्यांकडे धावणार्या त्यांच्या चेहर्यावरती … Read more

मृत आईला उठवतानाचा चिमुकल्याच्या व्हिडिओ व्हायरल; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुजफ्फरपूर रेल्वे स्थानकात एक मृत महिला आणि तिच्या लहान मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पाटणा उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश संजय करोल आणि न्यायमूर्ती एस. कुमार यांच्या दोन सदस्यांच्या खंडपीठाने या व्हिडीओचे वेदनादायक असे वर्णन केले आहे. खंडपीठाने सांगितले की, ‘ही धक्कादायक बातमीही … Read more

मान्सूनपूर्व परिस्थितीचा मुख्यमंत्री ठाकरेंकडून आढावा

मुंबई । मे महिना संपल्यातच जमा आहे. जून सुरु होताच मान्सूनची चाहूल लागण्याची शक्यता आहे. राज्यात आता कोरोनाची परिस्थिती सर्वाधिक बिकट आहे. अशा परिस्थितीत मान्सूनसाठी आपण तयार असले पाहिजे. आधीच संचारबंदीमुळे नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. मान्सूनमध्ये कोणते नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा … Read more

शरद पवारांना स्वत:चं घर सोडून मातोश्रीवर का जावं लागतंय? राम कदमांचे सरकारवर ताशेरे

मुंबई । महाराष्ट्र सरकार निष्फळ आहे असे अनेक भाजपा नेते यांनी याआधी विविध माध्यमातून मांडले आहेच. आता त्यामध्ये भाजपाचे वादातीत नेते आणि घाटकोपर पश्चिम चे आमदार राम कदम यांचीही भर पडली आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. इथे अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असताना तुम्हांला खुर्चीचा कसला विचार पडतो … Read more

आज महाराष्ट्रातून १४५ श्रमिक रेल्वे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार

मुंबई । गेल्या ३-४ दिवसात महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु होती. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवश्यक तेवढ्या रेल्वे पुरविल्या गेल्या नाहीत असा आरोप करताना पाहण्यात आले. तर दुसरीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सर्व प्रवाशांची सातत्याने मागणी केल्याचे दिसून आले. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोयल यांना चांगलाच दम देखील भरला होता. … Read more

तुम्ही राज्य सभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करता हे विसरू नका; राऊतांचा रेल्वेमंत्र्यांना दम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय रेल्वेने महाराष्ट्राला आवश्यक रेल्वे पुरविल्या नाहीत असा दावा केला होता. या विधानाला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटर द्वारे उत्तर दिले होते. त्यांनी ट्विट द्वारे सोमवारच्या १२५ रेल्वेची आवश्यक माहिती देण्याची मागणी ट्विटर वरून केली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना ट्विटरवरून चांगलाच दम … Read more

‘रेल्वे बुलाती हैं’ पण महाराष्ट्र सरकार म्हणतंय ‘जाने का नहीं’.. कारण ?

वृत्तसंस्था । १ जून पासून रेल्वेची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्याचे ऑनलाईन बुकिंग ही सुरु करण्यात आले होते. बुकिंग सुरु केल्यावर दोन तासातच दीड लाख प्रवाशांनी बुकिंग बुकिंग केल्याची माहिती रेल्वेने दिली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने राज्यातील आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातली आहे. तसे आदेश त्यांनी रेल्वेला पत्राद्वारे दिले आहेत. रेल्वेकडून १०० विशेष रेल्वेची यादी … Read more

१२ मे साठी रेल्वेचे तिकिट कसे काढायचे? जाणुन घ्या संपुर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली | लाॅकडाउनमध्ये बंद असणारी भारतीय रेल्वे आता मंगळवार पासून पुन्हा सुरु होणार आहे. यामुळे देशाच्या विविध भागांत अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र रेल्वेचे तिकिट कसे काढायचे याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. त्याबाबत आता IRCTC ने खूलासा केला असून तिकिट विक्री उद्या सोमवार, १‍१ मे पासून सुरु होणार आहे. रेल्वेचे तिकिट बुक … Read more