धक्कादायक! मैत्रिणीचा पाठलाग का करता अशी विचारणा केल्याने तरुणाचा निर्घृण खून

सांगली प्रतिनिधी । सांगलीतील हसनी आश्रम परिसरातील लक्ष्मीनगर येथे मैत्रिणीचा पाठलाग का केला याचा जाब विचारल्याने आज एका तरुणाच्या डोक्यात बांबूने हल्ला करून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. आकाश अशोक शिऱ्यापगोळ असे मृत तरुणाचे नाव असून त्याचा मित्र शशिकांत अण्णाप्पा कल्लोळी हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या … Read more

सांगलीमध्ये १० लाखांची सुपारी घेऊन केली राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या; ४ आरोपी अटकेत

सांगली प्रतिनिधी । दहा लाखांची सुपारी घेऊन सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांचा दोन फेब्रुवारीला खून करण्यात आला होता. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मयत आनंदराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित … Read more

सांगलीच्या गुलाबांनी साजरा होणार दिल्ली आणि मुंबईकरांचा ‘व्हॅलेंटाईन डे’; रेल्वेने फुलांची निर्यात सुरू

सांगली प्रतिनिधी । व्हॅलेंटाईन डे साठी दिल्ली व मुंबईत डच गुलाब या हरितगृहातील फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हलेंटाईन डे साठी हरितगृहातील फुलांची मोठ्याप्रमाणात निर्यात सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी मागणीमुळे डच गुलाबाचा दर चांगलाच वधारला आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात हरितगृहात मोठ्या प्रमाणात डच गुलाबाचे उत्पादन होते. व्हॅलेंटाईन डे साठी … Read more

सांगली जिल्ह्यामध्ये किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करून मुलाने केला पित्याचा खून

सांगली प्रतिनिधी । पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील विठ्ठलनगर पुनर्वसन वसाहतीमध्ये बापलेकांचं भांडण झालं. या भांडणात मुलाने बापाच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून, भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत तीन दिवसात दुसरा खून झाल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे. विठ्ठलनगर पुनर्वसन वसाहतीमध्ये … Read more

जीएसटीच्या राज्य कर अधिकाऱ्यांसह दोघांना अटक; करातील त्रुटी दूर करण्यासाठी मागितली ७० हजारांची लाच

सांगली प्रतिनिधी । वस्तू व सेवा कर विभागातील राज्यकर अधिकारी राजेंद्र महालिंग खोत याच्यासह कर सहायक शिवाजी महादेव कांबळे या दोघांना चाळीस हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. सांगली-मिरज रस्त्यावरील जीएसटी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाने ही कारवाई केली. मुल्यवर्धीत करातील त्रुटी दूर करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. दरम्यान, जीएसटी विभागात प्रथमच ही घटना घडल्याने जिल्ह्यात … Read more

सांगली जिल्ह्यामधील शिरगावात एकाच रात्रीत ८ ठिकाणी घरफोड्या

तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे बंद असलेली सात घरे व एक दूध डेअरी अशा आठ ठिकाणी एका रात्रीत घरफोड्या झाल्या आहेत. या घरफोडीत एका रिव्हॉल्वर चोरीसोबत मोठ्या रकमेवर चोरट्यानी डल्ला मारला आहे. या घरफोडीबाबत तासगाव पोलिसात ५० हजार रुपयांचे रिव्हॉल्वर चोरीला गेल्याची तक्रार जितेंद्र पाटील यांनी दिली. असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सांगली येथील श्र्वान पथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू होता.

जेव्हा मुख्यमंत्री तहसीलदारासाठी खुर्ची सोडतात; वाचा नेमकं काय घडलं..

मात्र, सर्व या समजांना आज खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फाटा देत वेगळे उदाहरण निर्माण करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला.

६२८ शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्या, गुगल ट्रान्सलेटरचा झटका

सांगली प्रतिनिधी | पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत लाभार्थी असलेल्या ६२८ शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे. गुगल ट्रान्सलेटरमुळे सदर शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी लाभार्थी असणार्‍या शेतकर्‍यांची यादी सेतु द्वारा करण्यात आली होती. सदर यादीची इंग्रजी भाषेतील … Read more

मिरजेत डोक्यात दगड घालून इसमाचा खून;आरोपी पोलीस ठाण्यामध्ये हजर

मिरज येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेत अनोळखी इसमाच्या डोक्यात राजू जाधव याने दगड घालून खून केला. घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या खुनातील आरोपी राजू जाधव हा स्वत: पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

जयंत पाटलांकडे जलसंपदा खाते आल्याने सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण करण्याचे आव्हान

राज्याचे जलसंपदा खाते जयंत पाटील यांच्याकडे आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या असून ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, वाकुर्डे या योजनांच्या पुर्ततेला आता गती येईल. जतच्या ४२ गावांचा प्रश्न मार्गी लागले, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजारामबापूंच्या पावलावर पाऊल ठेवून ते या योजनांसाठी ५ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतो.