नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या – विलासराव जगताप

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे रब्बी हंगामातील पिक विमा, अवकाळीने नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, यांसह नगरपालिका, बांधकाम विभाग, उत्पादन शुल्क अधिक्षक आदी ठिकाणी सुरु असणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, यासाठी जतचे माजी आमदार विलास राव जगताप यांनी कार्यकर्त्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी लाक्षणिक उपोषण केले . मागील वर्षभरामध्ये अवर्षणामुळे रब्बी पीक … Read more

शिरढोणमध्ये स्वाभिमानीने ऊसतोडी बंद पाडत रोखली वाहने

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ऊसदराचा तोडगा निघाल्याशिवाय गाळप हंगाम करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देत आज कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणमधील ऊसतोडी बंद पाडल्या. याशिवाय वांगी येथून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरची हवा सोडून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी गाळप सुरु केले असले तरी अद्याप दराचा तोडगा निघालेला नाही. रविवारी कोल्हापुरात स्वाभिमानी … Read more

अनिकेत कोथळे खूनप्रकरण, पुरावे पंचांनी ओळखल्याने नवा ट्विस्ट

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे संपूर्ण राज्यात गाजलेल्या अनिकेत कोथळे याच्या पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी बुधवारी जिल्हा न्यायालयात याप्रकरणातील पंच असणारे सांगली महानगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक श्रीपाद बसूदकर यांची साक्ष पूर्ण झाली. बासुदकर यांनी घटनेतील प्लास्टिकची पाईप आणि प्लास्टिकची बादली या दोन्ही वस्तू ओळखल्या. या प्रकरणाची सुनावणी सोमवारपासून प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही व्ही पाटील … Read more

ऊस हंगामाच्या तोंडावर कारखान्यांचे गाळप परवाने पेंडिंग

सांगली प्रतिनिधी | प्रलंबित ‘एफआरपी’ तसेच सरकारी देणी देण्यास विलंब या कारणांसहित साखर आयुक्त कार्यालयाने कोल्हापूर विभागातील १८ कारखान्यांचे गाळप परवाने आज अखेर पेंडिंग ठेवले आहेत. साखर हंगाम तोंडावर असताना परवाने पेंडिंग ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेंडिंग ठेवलेल्या कारखान्यांना १३ नोव्हेंबरला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आलेली आहे. पेंडिंग ठेवलेल्या साखर कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील … Read more

कामगारानेच ५१ लाखांच्या मुद्देमालावर मारला डल्ला

विटा पोलिसांच्या डीबी पथकाने अतिशय मोठ्या चपळाईने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बंद बंगल्याच्या छताचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातून १४५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोलेक्स कंपनीचे १ घड्याळ, स्विसकॉर्न कंपनीची २ घड्याळे रोख ३ लाख असा ५१ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या बिराप्पा बन्ने याला विटा पोलिसानी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ३२ लाखाचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.

कर्नाटक मधून जतला पाणी देणार – मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा

सांगली प्रतिनिधी । महाराष्ट्र ही संतांची व थोर महापुरुषांची भूमी असून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे जवळचे संबध आहेत.गेल्या महिन्यांपूर्वी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जत तालुक्याला पाणी देण्याबाबत एक तास चर्चा झाली. त्यानुसार महाराष्ट्रातील सीमाभागाला पाणी देण्याची कर्नाटक राज्याची तयारी आहे. यासाठी तुबची-बबलेश्र्वर योजनेतून किंवा कोट्टलगीजवळ आलेले पाणी बोर नदीत सोडून जतच्या पूर्व भागाला दिल्याने, … Read more

जिरवा-जिरवीचे राजकारण करणे हा विरोधकांचा उद्योग – सदाशिव पाटील

खानापूर मतदारसंघात विकासाचा माइलस्टोन ठरणारे एकतरी काम विद्यमान आमदारांनी केलेले दाखवावे. अवैधधंद्यांना संरक्षण द्यायचे, कॉन्ट्रॅक्टदारांना पाठीशी घालून नकारात्मक राजकारण मतदारसंघात करत फक्त आडवा-आडवी जिरवा-जिरवीचे उद्योग करायचे, हा विरोधकांचा उद्योग आहे, अशी घणाघाती टीका अपक्ष उमेदवार माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांनी केली.

कर्नाटकातून जतला कृष्णेचे पाणी देणार; अमित शहा यांची ग्वाही

म्हैसाळ, टेंभू योजनेसाठी भरीव निधी दिल्यामुळे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा कायापालट झाला. जतला आता तुबची बबलेश्वर योजनेच्या माध्यमातून कर्नाटक शासनाकडून पाणी देण्यात येेईल, यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा व देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे, पाणी निश्चित मिळेल,’ अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांनी जत येथे बोलताना दिली.

पतंगराव कदमांचे जावई संघाच्या शाखेत? लाड यांचा फोटो व्हायरल

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोधळे काँग्रेसचे जेष्ठ दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे जावई काँग्रेसचे कार्यकर्ते महेंद्र लाड यांचा संघाच्या शाखेतील फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. पतंगराव कदम यांच्या जावयांना संघाच्या शाखेत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पलूस शाखेच्यावतीने दसरा संचालन आज संपूर्ण … Read more

तासगाव मतदारसंघ पुन्हा अनुभवतोय आर आर आबांचा करिष्मा, ज्युनियर आर आर पाटील यांची प्रचारात आघाडी

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली असताना ज्युनिअर आर आर पाटील अर्थात रोहित पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. निवडणूक प्रचारातील रोहित यांचे मतदार संघात सध्या चांगलेच गाजत आहे. तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार आमदार सुमनताई आर आर पाटील यांचा ढवळी येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हे भाषण केले.