कावळ्यांना दररोज खायला घालणारे अनोखे ‘कावळे मामा’

बदलते हवामान, वाढते औद्योगिकरण आणि पर्यावरणाच्या होणाऱ्या ह्रासामुळे चिमण्या ,कावळे हे रोजच्या दिसण्यातले पक्षी सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असलेल्या कावळ्याच्या प्रजातीदेखील यामध्ये नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र काळाचे आणि पर्यावरण संतुलनाचे महत्व ओळखून माढा येथील हाॅटेल चालक अर्जून भांगे यांनी कावळांच्या संवर्धऩासाठी एक पाऊल उचलेले आहे. ते गेल्या अनेक वर्षापासून दररोज सकाळी कावळ्यांना विविध प्रकारचे खाद्य देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या नित्य नियमामुळे माढा परिसरात कावळ्यांची संख्या वाढली आहे.

कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत तब्बल ११ हजार शेतकरी; सातबारावर नोंद नसल्याने अडचण

अवकाळी पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हाता तोंडाशी आलेले पीक गेल्याने त्यांचे कंबरडे मोडले. याचा परिणाम म्हणून आवक नसल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा राहिला त्यांना उच्चांकी भाव मिळाला. मात्र असंख्य शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. मात्र मागील वर्षी कांद्याचे उत्पादन चांगले आले होते.

कांद्याचे भाव तब्बल ५ हजारांनी घसरले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याला २० हजार रुपये देण्याची विक्रमी घोषणा केल्यानंतर शनिवारी जवळपास ५०० ते ७०० ट्रक कांदा बाजार समितीत दाखल झाला. मात्र हा कांदा प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने कांद्याचा दर सरासरी ५ हजाराने कोसळला आहे. साठवणूक केलेला कांदा व्यापारी पुन्हा बाजारात आणत असल्याने आवक वाढल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आज सरासरी कांदा ३ हजार ते १० हजार प्रति क्विंटल दराने गेला आहे.

हैदराबाद पोलिसांना शाब्बासकी देत सरकारने क्लीन चिट दिली पाहिजे- आमदार प्रणिती शिंदे

आज सकाळी हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील ४ आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी एन्काउंटर केला. त्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी पोलिसांच अभिनंदन केलं आहे. विविध क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींनी या कारवाईचे समर्थन केलं असताना सरकारने त्या पोलिसांच्या पाठीशी उभ राहून पोलिसांना क्लीन चिट दिली पाहिजे. असं मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ”या पुढे बलात्काऱ्यांचा थर्ड डिग्री टॉर्चर करून एन्काउंटर करायला पाहिजे आणि या केस मधील फाईल लवकरात लवकर क्लोज करुन पोलिसांना शाब्बासकी दिली पाहिजे” असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं.

देशातील सर्वात महाग कांदा सोलापुरमध्ये !

सोलापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राज्यातील नव्हे तर चक्क देशातील सर्वात उच्चांकी दर कांद्याला मिळाला आहे. सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याला चक्क २०,००० हजार रूपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. प्रति क्विंटल ला इतका दर मिळाल्यामुळे सर्वांच्या नजरा सध्या कृषी सोलापूरकडे वळल्या आहेत. कांद्याला मिळालेला आजवरचा हा विक्रमी दर आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी पोलिस अधिकाऱ्याचा पुढाकार, १ महिन्याचा पगार पाठवून उचलला खारीचा वाटा

पावसाळ्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला. यामध्ये हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन कर्जमाफीची अपेक्षा आहे. परंतु सरकारला सुद्धा सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन माढ्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी आपला एक महिन्याचा पगार देऊ केला असून याबाबतचे पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

सोलापुरात ‘महाविकासाआघाडी’ला मोठा धक्का, महापौरपदी ‘भाजपा’च्या श्रीकांचना यन्नम

सोलापूरच्या महापौरपदी ‘भाजपा’च्या श्रीकांचना यन्नम यांची बहुमताने निवड झाली आहे. त्यांनी ‘एमआयएम’च्या शहाजीदा बानो शेख यांचा पराभव केला आहे. ओबीसी महिलांसाठी सोलापूर महापौरपद हे यंदा राखीव होतं. दरम्यान शिवसेनेच्या सारीका पिसे आणि कॉंग्रेसच्या फिरदोस पटेल यांनी अनपेक्षित माघार घेतल्याने या निवडणुकीला वेगळीच कलाटणी मिळाली. या मध्ये यन्नम यांना ५१ मते, तर शेख यांना ८ मते मिळाली. यामध्ये कॉंग्रेस आणि शिवसेना, वंचीतचे नगरसेवक तटस्थ राहिले. या निवडणुकीमुळे सोलापूर ‘मनपा’मध्ये ‘महाविकासआघाडी’चे चित्र फसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

दरम्यान महापौर आणि उपमहापौर पदासाठी बुधवारी सकाळी ११.३०

विष्णूपदाच्या  दर्शनासाठी पंढरपूरात भाविकांची गर्दी

पंढरपूर प्रतिनिधी | वारकरी परंपरेत मार्गशिर्ष महिन्याला अनन्य साधारण महत्व असते. या महिन्यात भगवान पांडुरंग हे गोपाळपूर जवळील चंद्रभागेतील विष्णूमंदिरात वास्तव्यास जातात. या महिन्यात भाविक विठ्ठलाच्या दर्शऩासाठी मंदिरात न जाता ते विष्णूपदाच्या दर्शऩासाठी अवर्जून हजेरी लावतात. चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरापासून दक्षिणेस दीड किलोमीटर अंतरावर भगवान विष्णूचे मंदिर आहे. मंदिराला विष्णूपद म्हणून ओळखले जाते. येथे रुक्मिणीच्या सोधासाठी … Read more

धक्कादायक! प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी | नऊ वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने राहत्या घरी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे. लग्नास नकार देऊन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून तरूणीने आत्महत्या केल्याप्रकरणी मोहोळ येथील शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखाचा मुलगा व शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविकेवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवरत्न दीपक गायकवाड, … Read more

अक्कलकोटजवळ स्कोर्पिओ ट्रकचा अपघात, मुंबईतील तीन जण जागीच ठार

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर अक्कलकोट महामार्गावर अक्कलकोटजवळ स्कोर्पिओ आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास अक्कलकोट जवळ स्कोर्पओ आणि ट्रक यांचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये स्कोर्पिओ गाडीचा चक्काचूर झाला आहे तर गाडीतील तीन जण जागीच ठार झाले आहेत. दरम्यान अपघातातील … Read more