अवघ्या चार वर्षाचा ‘वंडरबॉय’, तीन जागतिक विक्रम केले नावावर

सोलापूरच्या तणविर पात्रो या चार वर्षीय बालकाने तीन जागतिक कीर्तीचे विक्रम केले आहेत. इंग्रजी, मराठी, ओडिया, हिंदी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या तणविरला २७ डिसेंबर २०१८ ला ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्डसचा “इंटरनॅशनल अमेझिंग वंडर कीड’ हा किताब मिळालाय तर, २८ डिसेंबर २०१८ रोजी त्याने इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये जागतिक विक्रम केला.

आता रश्मी बागल यांचं पुढं काय ?

करमाळा प्रतिनिधी | राष्ट्रवादीशी बंडखोरी करत, शिवसेनेत रश्मी बागल यांनी प्रवेश केला.बागलांच्या प्रवेशामुळे नारायण पाटील यांचे तिकीट सेनेने कट केले होते. बागलांचा विजय सेनेच्या तिकिटावर येईल असा विश्वास होता. मात्र अपक्ष संजय शिंदे यांनी त्यांचा तब्बल २५ हजार मताधिक्याने पराभव केला. तर नारायण पाटील यांनी शिंदेंना चांगलीच टफ दिली, खेचा खेचीच्या निकालानंतर शिंदे विजयी झाले. … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित मदत मिळणार, खासदार जयसिध्देश्वर महाराज

उत्तर सोलापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे सोलापूरचे खासदार शिवाचार्य जयसिध्देश्वर महाराज यांनी नान्नज,मोहीतेवाडी, रानमसले शिवारात जाऊन नुकसानग्रस्त द्राक्षे, कांदा, सोयाबीन, मका, फळबागा यांची पाहणी केली. यावेळी रानमसलेतील शेतकरी औदुंबर दामोदर गरड यांच्या या शेतातील अवकाळी पावसाने सडलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी जयसिध्देश्वर यांनी केली.

करमाळ्यात मतदानाला गालबोट, संजय शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीचा प्रकार

सोलापूर प्रतिनिधी । अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली आहे. या मारहाणीत नारायण पाटलांचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. डोक्याला जबर मार बसल्याने कार्यकर्ता रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माढ्यातील दहिवली भागात … Read more

सोलापूर जिल्ह्यात मतदान संथगतीने; दुपारपर्यंत केवळ ३३.१२ टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत ३३.१२ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली.

सोलापूर मधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदान व्यवस्थित पार पडत आहे, तसेच नागरिकही मोठ्या उत्साहात मतदानाला जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु सोलापूर मधील सूतगिरणी परिसरात राहणाऱ्या सुमारे १ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधीना मतदान करूनही आपल्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत म्हणून हे पाऊल उचललं असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.

प्रणिती, तुझ्या बापाला तुरुंगांत घातल्याशिवाय मी गप्प बसणार नाही – आडम मास्तर

सोलापूर प्रतिनिधी | राज्याभर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटले असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. असाच एका प्रचार सभेत कामगार नेते आडम मास्तर यांची जीभ घसरली आहे. प्रणिती, तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत आडम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

सर्व राजकारण्यांची संपत्ती वाढली मात्र आडम मास्तरवर गुन्हे वाढले असं वर्तमान पत्रात आलं होतं. माझ्यावर आत्तापर्यंत १६५ गुन्हे दाखल आहेत. आणि गुन्ह्यांची डबल सेंच्यूरी मारल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं म्हणत आडम यांनी आपल्यावरील गुन्हे हे आपल्यासाठी अलंकार असल्याचं म्हटलं आहे.

माझ्यावर इतके गुन्हे नोंद असून मी भित नाही. मी परवानगी नसताना सत्याग्रह केले, आंदोलनं कली, मोर्चे काढले. हे सगळं लोकांसाठी केलं असं सागत काही जणांवर नुसते पाच गुन्हे नोंद काय झाले तर ते थरथर कापायला लागतात असं म्हणत आडम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

 

‘या’ मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांविरुद्ध लढणार

सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीतील दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे पंढरपुरातील आघाडीतला हा घोळ आता चांगलाच चर्चेचा विषया झाला आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे असलेले आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून काँग्रेसच्या वाट्याला असलेली पंढरपुरची जागा राष्ट्रवादीकडे घेतली मात्र अशातच काल रात्री … Read more

सोलापुरात चक्क घोड्यावर बसून केला एकाने उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर प्रतिनिधी। राजकारणात कधी कोण काय करेल याचा नेम नाही. असाच एक भन्नाट प्रकार आज सोलापूरमध्ये पाहायला मिळाला. बशीर अहमद शेख नावाच्या उमेदवाराने चक्क घोड्यावर बसून सोलापूर शहर मध्य जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पराक्रम केला आहे. सोलापूर मध्य मतदारसंघ तसा चर्चेतील मतदारसंघ. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार यांची कन्या प्रणिती शिंदे येथील विद्यमान आमदार. … Read more

जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीने तरुणाला चिरडलं, जमावाकडून गाडीची तोडफोड

सोलापूर प्रतिनिधी | जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाचा अपघात झाला असून अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली असल्याचं सांगण्यात येत आहे. सोलापूरमध्ये जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीचा अपघाता झाला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्याता आली आहे. या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत … Read more