अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर 4 दिवसांत राज्य विकतील; पडळकरांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत सुरूवात झाली. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे मुख्यमंत्री उपस्थित नाहीत. यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चार्ज वरून सकाळी चर्चा रंगू लागल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर 4 दिवसांत राज्य विकतील अशी जोरदार टीका पडळकरांनी केली. … Read more

राष्ट्रवादीच्या पोस्टर वरून अजित पवारांचा फोटो गायब?? चर्चांना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसची दिल्लीत महत्त्वाची बैठक असून राष्ट्रवादीचे राज्यातील महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित आहेत. परंतु विशेष म्हणजे राष्ट्रवादी कार्यालयाबाहेरील स्वागतासाठी लावण्यात आलेल्या पोस्टर मधून चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच फोटो गायब झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चाना उधाण आले आहे. या पोस्टर वर शरद पवार यांच्यासह नेते प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांचे … Read more

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात निर्बंध लागणार? अजित पवार म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना व्हायरस चे प्रमाण कमी आलं असतानाच आता एक नवी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याने आता जगभरातच चिंतेचं वातावरण आहे. पंतप्रधान मोदींनी देखील या विषाणूची दखल घेत काही निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना … Read more

अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याचे आयकर विभागाचे आदेश; राष्ट्रवादीला अजून एक धक्का

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर राज्यातील महाविकास आघाडीला अजून एक जबर धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस आयकर विभागाने दिली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. … Read more

विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही; अजितदादांच्या कामाच्या धडाक्याने रोहित पवार भारावले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या धडाकेबाज कामासाठी आणि कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. अजित पवारांच्या याच गुणाचे कौतुक त्यांचे पुतणे आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट द्वारे अजितदादांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. भल्या सकाळी पावणेसहा वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत काम करणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे … Read more

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पुण्याचे?; चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

ajit pawar chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर निशाणा साधला आहे. अजित पवार हे नेमकं राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पुण्याचे उपमुख्यमंत्री आहेत असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. आज सकाळी पुण्यातल्या मानाच्या कसबा गणपतीचं दर्शन चंद्रकांत पाटील यांनी घेतलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना … Read more

कारणे सांगू नका, माझ्या गतीने काम करा; अजितदादांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्य आणि दमदार कामासाठी ओळखलं जातात. आजही त्यांनी अगदी सकाळी 6 वाजता कामाला सुरुवात केली. अगदी सकाळी बारामती येथे झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. मला कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, असं अजित पवार यांनी म्हटलं. मला कोणतीही कारणे सांगू नका, … Read more

एसटी महामंडळाला 500 कोटी वितरित; अजित पवारांचे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हा निधी तातडीने वितरीत करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी १४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित … Read more

पुणे मेट्रोच्या पहिल्या ट्रायल रनला अजित पवारांकडून हिरवा झेंडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बहुप्रतीक्षीत पुणे मेट्रो आज अखेर ट्रायल रनच्या निमित्ताने धावली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.वनाझ ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन आज पार पडली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते. वनाज ते रामवाडी … Read more

भाजप-सेना पुन्हा युती होणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर

Uddhav Thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा पुन्हा जोर धरू लागली. पण, आज स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर दिले आहे. तसेच भाजपाची अधिवेशनामधील दोन दिवसांची वर्तवणूक ही महाराष्ट्राची मान शरमेने मन खाली घालणारी होती अशी टीकासुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. … Read more