Tuesday, February 7, 2023

विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही; अजितदादांच्या कामाच्या धडाक्याने रोहित पवार भारावले

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या धडाकेबाज कामासाठी आणि कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. अजित पवारांच्या याच गुणाचे कौतुक त्यांचे पुतणे आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट द्वारे अजितदादांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

भल्या सकाळी पावणेसहा वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत काम करणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे अजितदादा! गेल्या तीस वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता कायम आहे. विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही. आजही पहाटेच बारामतीत विविध कामांना भेट देऊन त्यांनी आढावा बैठक घेतली.असे रोहित पवारांनी म्हंटल.

- Advertisement -

विकास कामं करताना दादांचं त्यावर बारकाईने लक्ष असतं. आज मीही त्यांच्यासोबत उपस्थित होतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादांसारख्या खऱ्या अर्थाने कार्यकुशल आणि विकासाचं व्हिजन असलेल्या नेत्याकडून धडे गिरवण्याची संधी मिळतेय, हेही माझं भाग्यच आहे.असे म्हणत त्यांनी अजितदादांवर स्तुतीसुमने उधळली.

दरम्यान, अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सोबतीला आज रोहित पवारही होते. अजितदादांच्या नियमानुसार आज सकाळीच म्हणजे सहाच्या ठोक्याला दादांनी काम सुरु केलं. दादांचं नेहमीच काम बघितलेल्या रोहित पवारांना आज पुन्हा एकदा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची भुरळ पडली.