‘त्या’ तरुणीच्या हत्येप्रकरणी दत्तापूर ठाणेदाराला अखेर अटक

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात प्रेम प्रकरणातून ६ जानेवारीला एका १८ वर्षीय महाविद्यायलीन तरुणीची चाकूने भोसकून एका माथेफेरूने निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर या माथे फेरूने स्वतःही चाकूने वार करून घेतले होते. दरम्यान माझ्या मुलीच्या हत्येमागे ठाणेदारच असल्याचं धक्कादायक आरोप तरुणीच्या आईने केला होता. त्यानंतर रवींद्र सोनवणे या ठाणेदाराचे निलंबन करून चौकशी … Read more

अमरावती जिल्ह्यातील जैनपूर येथे थ्रेशरमध्ये अडकून शेत मजूराचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या जैनपूर येथे आज सकाळी 11च्या दरम्यान थ्रेशर मशिनवर हरबरा काढनीचे काम करत असताना मजूराचा मूत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भामोद शेत शिवारात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शेतात हरभरा काढनीचे काम … Read more

पुन्हा अस्मानी संकट! अमरावती जिल्ह्यात गारांसह जोरदार पाऊस; रब्बीचं पीक सुद्धा गेलं?

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई शेतकऱ्याच्या शेतमालाला एकीकडे भाव नाही आणि दुसरीकडे निसर्ग देखील बळीराज्यावर कोपला आहे. त्यातच रविवारी ४ वाजेच्या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या तोंडच पाणी पळालं आहे. या अवकाळी पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतात काढणीवर असलेल हरभरा, … Read more

प्रेमविवाह न करण्याच्या शपथ प्रकरणी प्राचार्यांसह तिघांचे निलंबन; विद्यार्थीनी कारवाईच्या विरोधात

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना प्राध्यापकांनी प्रेम व प्रेमविवाह न करण्याची शपथ दिली होती. ही शपथ १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीरात टेंभुर्णी येथे दिली होती. या प्रकरणात विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीने प्राचार्यांसह दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. याचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर सोसायटीने एका … Read more

मोर्शीमधील दमयंती नदीजवळ सापडले नवजात अर्भक

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावतीतील मोर्शी शहरातील दमयंती नदीच्या काठावर नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दमयंती नदीच्या काठावर असलेल्या कैलास टॉकीजच्या जवळच कोणीतरी अज्ञाताने हे नवजात अर्भक टाकल्याची चर्चा परिसरातील नागरिक करत आहेत. अनैतिक संबंधातून या बाळाचा जन्म झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दमयंतीनदीच्या काठाजवळ हे नवजात अर्भक … Read more

विषारी वनस्पती खाल्ल्याने तब्बल ४५ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई शेतात चरायला गेल्यावर विषारी वनस्पती खाल्याने अमरावतीतील वडगाव राजदी येथील ४५ जनावरे दगावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर गावातील बहुतांश जनावरांची प्रकृती सध्या गंभीर आहेत. दरम्यान, गावातील गुराख्याने जनावरे चरायला नेली असता ढोरकाकडा नावाची वनस्पती जनावरांच्या खाण्यात आल्याने जनावरांना विषबाधा झाली. त्यामुळे ४५ जनावरांचा मृत्यू झाला. पशु वैधकिय अधिकाऱ्यांना … Read more

अमरावती जिल्ह्यात दारुबंदीसाठी महिलांचा पोलीस ठाण्याला घेराव; पोलीस आणि दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे महिलांनी दारूबंदीसाठी मंगळवारी पोलीस स्टेशनला घेराव घालून गावामध्ये दारूबंदी करा अशी मागणी करत महिला आक्रमक झाल्या होत्या. तसेच पोलीस दारू विक्रेत्यांकडून हप्ता घेत असल्याचा आरोपही महिलांनी पोलिसांवर केला आहे. त्यामुळे पोलिसांचे आणि दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान वारंवार विनवणी करून देखील गावात दारुबंदी होत … Read more

स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला म्हणून चोरटयांनी CCTV कॅमेरे केले लंपास

अमरावती प्रतिनीची । आशिष गवई अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील बस स्टँडसमोर असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सोमवारी रात्री फोडण्याचा प्रयन्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, चोरटे एटीएम फोडण्यास अयशस्वी झाले असले तरी त्यांनी CCTV कॅमेरे चोरत घटनास्थळावरून पोबारा केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि काही चोरटयांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमच्या … Read more

‘तिच्या’ जाण्याने माझ्यातील आई निशब्द झाली आहे; हिंगणघाटच्या पीडितेच्या मृत्यूवर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेवर ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती अपयशी ठरली. या घटनेनंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. … Read more

दिव्यांगांचा महानगरपालिकेवर धडक मोर्चा; घरकुल मिळण्याची केली मागणी

अपंग बांधवांच्या घरकुलाच्या प्रश्ना संदर्भात आज शेकडो अपंग बांधवानी राज्यमंत्री बचू कडू यांच्या प्रहार संघटनेच्यावतीने चंदू खेडकर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर धडक दिली. यावेळी मनपा आयुक्त यांना प्रतिकात्मक घरकुल ही भेट देण्यात आले.गेल्या चार वर्षांपासून महानगरपालिकेने अपंग बांधवांच्या घरकुलाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवाना तात्काळ घरकुल मिळावे अशी मागणी या मोर्चातील नागरिकांनी केली आहे.