Saturday, March 25, 2023

अमरावती जिल्ह्यातील जैनपूर येथे थ्रेशरमध्ये अडकून शेत मजूराचा दुर्दैवी मृत्यू

- Advertisement -

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या जैनपूर येथे आज सकाळी 11च्या दरम्यान थ्रेशर मशिनवर हरबरा काढनीचे काम करत असताना मजूराचा मूत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भामोद शेत शिवारात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शेतात हरभरा काढनीचे काम सुरू होते. मजूर सुधाकर मधूकर मोरे वय 43 वर्ष हा मजूर थ्रेशरमध्ये हरभरा टाकत होता. मात्र हरभरा टाकत असताना त्याचा तोल गेला आणि तो थ्रेशरमध्ये अडकला. ही गोष्ट तेथील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी थ्रेशर बंद केलं. मात्र तोपर्यंत या मजुराचा मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच येवदा पोलिसांनी धटनास्थळी पोहचून पंचनामा केला आणि या मजुराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेचा पुढील तपास येवदाचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक कट्यारमल करीत आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.