गुवाहाटीत अनिश्चित काळासाठी कर्फ्यू जाहीर; कॅब विरोधात संपूर्ण आसाममध्ये आंदोलन तीव्र

आसाम राज्यात नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (कॅब) तेथील जनता तीव्र विरोध दर्शवत रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळं कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गुवाहाटीत आज संध्याकाळी ६.१५ मि.पासून अनिश्चित काळासाठी कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. याबाबत गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. जोपर्यंत संपूर्ण परिस्थिती पूर्वीसारखी शांत होत नाही तोपर्यंत कर्फ्यू लागू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयक: आसाममध्ये आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार

गुवाहाटी | नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन ईशान्य भारत धुमसत आहे. बुधवारी आसाममध्ये निदर्शने होत असताना पोलिस आणि आंदोलकांतमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. पोलिसांनी सांगितले की परिस्थितीवर मात करण्यासाठी डिब्रूगडमधील पोलिसांनी आंदोलकांवर रबर गोळ्या झाडल्या आणि लाठीचार्जही केला. त्याच वेळी, गुवाहाटीमधील विद्यार्थ्यांनी मुख्य जीएस मार्ग बंद केला, त्यानंतर सचिवालयाजवळ पोलिसांशी चकमकी झाल्याचे वृत्त आहे. Assam: Protest being held … Read more