जिगरबाज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आज वाढदिवस

महाराष्ट्राचे जिगरबाज आणि लाडके मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वयाची ६० वर्षं पूर्ण केली आहेत. कोरोना संकटकाळात आपला वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.

यंदा उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत; शिवसैनिकांना केलं ‘हे’ मोठं आवाहन

मुंबई । येत्या २७ जुलै रोजी वाढदिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळं आपल्या नेत्याचा हा वाढदिवस शिवसैनिकांसाठी निश्चितच मोठा आहे. दरवर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांची ‘मातोश्रीवर’ रीघ लागते. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी वेळीच या संदर्भात … Read more

राम मंदिर भुमिपूजनाच्या निमंत्रणावरून उद्धव ठाकरेंचा अपमान केला जातोय- काँग्रेस

मुंबई । अयोध्या राम मंदिर भुमिपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न पाठवण्यावरून वाद सुरू झालाय. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मंदिर कमिटीला पत्र देखील लिहिले. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांच्या बचावासाठी काँग्रेस धावून आली आहे. उद्धव ठाकरेंचा अपमान केला जात असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरेंना राम … Read more

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्यत जाणार का? संजय राऊत म्हणाले..

मुंबई । अयोध्येतील राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. दरम्यान या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार की नाही याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील अशी माहिती संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना दिली आहे. “अयोध्येला उद्धव … Read more

शरद पवारांनंतर संजय राऊतांनी घेतली उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत, ‘या’ तारखेला होणार प्रसिद्ध

मुंबई । काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची राज्यात बरीच चर्चा झाली होती. दरम्यान, संजय राऊत यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीतील एक फोटो नुकताच राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत मुलाखतीविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे. या … Read more

उद्धव ठाकरेंना अयोध्येला जायला निमंत्रणाचा गरज नाही; संजय राऊतांचा भाजपाला टोला

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी निवडक १०० मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, राम मंदिर भूमिपूजनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नसल्याच्या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांना छेडले असता, ” … Read more

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून शिवसेनेची काँग्रेसकडे दिलगिरी

मुंबई । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल महाविकास आघाडीत पुन्हा एकदा … Read more

आदित्य ठाकरेंचा उल्लेख का होतोय बेबी पेंग्विन ? काय आहे प्रकरण?

मुंबई| ठाकरे सरकारची तुलना मुघल राजाशी केल्याने एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीत ठक्कर या मुंबईतील एका यूजर ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. १ जुलै रोजी करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हा नव्या काळातील औरंगजेब असा केला असून … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक, विद्यापीठ परिक्षाबाबत होणार महत्वाचा निर्णय 

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक होणार आहे. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा होणार असून यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे … Read more

अनिल कपूरकडून ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे कौतुक; म्हणाला…

मुंबई | भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. आतापर्यंत, कोरोना संक्रमित लोकांची एकूण संख्या 7,19,665 वर पोहोचली आहे. त्यापैकी 2,59,557 सक्रिय प्रकरणे आहेत तर 4,39,948 लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी, या धोकादायक विषाणूमुळे 20,160 लोक मरण पावले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. अशा परिस्थितीत कोरोनासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अभिनेता अनिल … Read more