आदित्य ठाकरेंचा उल्लेख का होतोय बेबी पेंग्विन ? काय आहे प्रकरण?

मुंबई| ठाकरे सरकारची तुलना मुघल राजाशी केल्याने एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीत ठक्कर या मुंबईतील एका यूजर ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. १ जुलै रोजी करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हा नव्या काळातील औरंगजेब असा केला असून आदित्य ठाकरे यांना मोहम्मद आझम शाह उर्फ बेबी पेंग्विन असंहि म्हटलं आहे.

त्यामुळे ट्विटरला सध्या #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. समीत ठक्कर याच्यावर तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी ट्विटर युजर समीत ठक्कर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

समीर ठक्कर याने आपली बाजू मांडताना म्हणाला आहे कि, “मी फक्त कठोर भाषेचा वापर केला आहे. जर माझी पोस्ट खूपच आक्षेपार्ह होती तर ट्विटने ती काढली का नाही ? सरकारवर टीका करण्याच्या माझा अधिकार आहे आणि तो लोकशाहीने मला दिला आहे. माझ्या लोकशाही अधिकाराचा मी वापर केला आहे,” असं म्हटलं आहे.
नागपूरचा रहिवासी असलेल्या समीर ठक्कर याने यापूर्वी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासहित ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावरही आक्षेपार्ह शब्दात टीका केली असून सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते.

“व्ही पी रोड पोलिसांनी संपर्क साधला असता मी लॉकडाउन संपल्यानंतर पोलीस स्टेशनला येऊ शकतो असं कळवलं असून पोलीस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांना ईमेल करुन जबाब पाठवला आहे,” अशी माहिती समीर ठक्करने दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.