तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे..!!

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न संपूर्ण राज्याला सध्या पडला आहे. विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या जनतेने युतीच्या पारड्यात आपला कौल दिला होता. मात्र शिवसेनेने युती ही पद आणि जबाबदाऱ्यांच्या समसमान वाट्यावरच झाली होती असे सांगत मुख्यमंत्रीपदावर आपला दावा केला आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेसोबत मुख्यमंत्री पदाबाबत काही चर्चाच झाली नसल्याचा खुलासा करत भाजपने सेनेचा दावा खोडून काढला.

शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेबांना दिलेलं वचन – उद्धव ठाकरे

 मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंना दिलेले वचन आहे असे मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेसोबत काही बोलणेच झाले नाही असे म्हणल्यानंतर ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत फडणवीस घोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. … Read more

मला खोटं पाडल्याबद्दल फडणवीसांचं आभार; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

शिवसेनाप्रमुखांना मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसैनिक बसवेनच असं वचन दिलं होतं. आता ते वचन पाळण्याची जबाबदारी माझी आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी माझी भूमिका ऐकली होती आणि त्यावर त्या दोघांचं एकमत होत नव्हतं. स्वतःला पक्षात अडचण येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मलाच खोटं ठरवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही ठाकरे पुढे म्हणाले. पद आणि जबाबदऱ्यांचं सम-समान वाटप हे ठरलं होतं, आणि आता हेच ते नाकारत असतील तर मी काय बोलणार असं म्हणत गोड बोलून आम्हाला नेहमी फरफटायला लावणाऱ्या भाजपचा खरा चेहरा आज उघडकीस आला असल्याची खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.

मी पुन्हा येईल म्हणणार्‍या फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. ‍‌१३ व्या विधानसभेचा कार्यकाळ आज ८ नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे फडणवीस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and other state ministers meet Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/grmCMrHLg9 — ANI (@ANI) November … Read more

संजय राऊतांचा उद्धव आणि आदित्य ठाकरेंना धोबीपछाड

विशेष प्रतिनिधी | सध्या राज्यात सत्तास्थापनेवरून रणसंग्राम सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पारड्यात स्पष्ट बहुमत टाकून देखील भजप शिवसेना अद्याप सत्ता स्थापन करू शकले नाहीत. आमची दारे चर्चेसाठी कायम उघडी असल्याचे भाजप सांगतंय परंतु मुख्यमंत्री पदाबाबत तडजोड नाही अशी भूमिका घेतय. तर मुख्यमंत्री पदाशिवाय चर्चाच नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे सत्तेचं घोड काही … Read more

तथाकथीत मध्यस्थांची गरज नाही, संजय राऊतांचा भिडे गुरुजींना टोला

मुंबई प्रतिनिधी | सत्तावाटपाच्या मुद्द्यावरुन सेना भाजप यांच्यात चांगली जुंपली असून हा तिढा मध्यस्तांच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. गुरुवारी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे आणि भिडे यांची भेट होऊ शकली नाही. यावर तथाकथीत मध्यस्तांची गरज नाही असं म्हणत संजय … Read more

हिम्मत असेल तर आमदार फोडून दाखवा, शिवसेना आमदाराचे भाजपला ओपन चँलेंज

मुंबई प्रतिनिधी | हिम्मत असेल तर आमचे आमदार फोडून दाखवा असे आव्हान शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी केले आहे. भाजपचे नाव न घेता पाटील यांनी भाजपला आॅपन चँलेंज दिले आहे. हिम्मत असेल तर आमदार फोडून दाखवा असं चँलेंज देत आमदार फोडणे म्हणजे मंडईतला भाजीपाला आहे काय? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला अाहे. मुख्यमंत्री पदावरुन … Read more

शरद पवारांचा मास्टरप्लान, भाजपला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंना आणणार एकत्र

विशेष प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी अद्याप महाराष्ट्रात सरकार स्थापन झालेले नाही. भाजप शिवसेना सत्तास्थापनेवरुन एकमेकांवर आखपाखड करत असताना मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशात राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा नवी मास्टरप्लान शरद पवार आखत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या … Read more

‘या’ कारणामुळे उद्धव ठाकरें समोर वृद्ध शेतकरी ढसाढसा रडला

लातूर प्रतिनिधी | शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीची व्यथा उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडताना एका वृध्द शेतकऱ्याने हंबरडा फोडला. नांदेड जिल्ह्यातील कंधार मधल्या किरोळा इथं उद्धव ठाकरे हे बाधित पिकांची पाहणी करण्यासाठी गेले असता तिथे एका शेतकर्‍याने ठाकरे यांच्यासमोर ढसाढसा रडायला सुरवात केली. … Read more

ठरलं! मुख्यमंत्री शिवसेनेचा, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा? पण..

विशेष प्रतिनिधी | सत्तास्थापनेवरुन महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही असताना भाजप मात्र मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. मुख्यमंत्रीपदावरुन महायुती बिघाड झाल्याने आता शिवसेना आघाडीसोबत जाऊन सरकार स्थापन करणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समोर येत आहे. महायुतीला मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला असूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. महायुतीमधील कलह दिवसागणिक वाढत … Read more