कोरोना’मुळे श्री नाथषष्ठी महोत्सवाला स्थगिती – भारतात कोरोनाचे ४३ रुग्ण

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पैठण येथील श्रीनाथ षष्ठी महोत्सवाला स्थगिती देण्यात आली आहे. असा अध्यादेश आज (दि.10) जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे.

औरंगाबादमध्ये कॉफीमुक्त अभियान सुरु ; गुलाबाचे फुले वाटून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न

वर्षभर अभ्यास करूनही इंग्रजीच्या पेपरला जाताना विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात धाकधूक असते. मुलांच्या मनातील इंग्रजीची भीती घालविण्यासाठी तसेच उत्साहपूर्ण वातावरणात पेपर सोडविण्यासाठी गारखेडा परिसरातील कन्या विद्यालय केंद्रात कॉफिमुक्त अभियान उपक्रम राबविण्यात आला. परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. # Hello Maharashtra

आ. हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; जाधव यांच्या अडचणीत वाढ

मनसेचे माजी आ.हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यामुळे हर्षवधन जाधव यांच्या अडचनीत वाढ झाली आहे.

चिंताजनक! औरंगाबाद जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ; जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या वाढली असून ही संख्या 4929 वर पोहोचली आहे. मात्र जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी कुपोषित बालकांची संख्या तीन हजाराच्या आसपास होती. मात्र यावर्षी या कुपोषित बालकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ही संख्या का वाढत आहे? याला कारण … Read more

अकबरुद्दीन ओवैसी यांच्या औरंगाबादमधील सभेवर बंदी घाला; भाजप शहराध्यक्षाची मागणी

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबादेत होणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभेवर बंदी घाला. अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी केली आहे. येत्या आठवड्यात एआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची औरंगाबादेत सभा होणार आहे. मात्र, अकबरुद्दीन यांना औरंगाबादमध्ये सभा घेण्यास बंदी घालावी अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. एकीकडे दिल्लीमध्ये हिंसाचार सुरू असताना आपल्या विवादित वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या … Read more

योगायोग! औरंगाबाद जिल्ह्यातील २ मंत्र्यांची गावे पहिल्या कर्जमाफी यादीत

औरंगाबाद प्रतिनिधी । महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांच्या मतदार संघातील प्रत्येकी एका गावाची कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीत वर्णी लावण्यात आली आहे. दोन्ही मंत्री शिवसेनेचे नेते आहेत. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजने अंतर्गत कॅबिनेटमंत्री संदीपान … Read more

धक्कादायक! औरंगाबादमध्ये घरात घुसून महिलेवर अत्याचार; आरोपी विरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी । शहरातील मुकुंदवाडी परिसरात राहत असलेल्या ३५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मुकुंदवाडी परिसरात एकच खळबळ उडाली असून अत्याचार करणाऱ्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सुरेश गिरी राहणार मुकुंदवाडी परिसर असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पीडित … Read more

शासन निर्णयामुळं औरंगाबाद जिल्ह्यातील ३० शाळा कायमस्वरूपी होणार बंद! तर राज्यातील ९१७

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३० शाळा बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांनी दिली आहे. राज्यभरातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ९१७ शाळा बंद करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा शासन निर्णयामुळे … Read more

लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

औरंगाबाद प्रतिनिधी । सागर सीताराम ढगे (वय३०) याचा पहिल्या पत्नीपासून सुमारे दीड वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्याचे पहाडसिंगपुरा भागात राहणाऱ्या एका महिलेसोबत काही महिन्यांपूर्वी प्रेमसंबंध जुळले होते. ती महिला देखील पतीपासून विभक्तच राहत होती. दोघांनी नवीन संसार थाटण्याचा निर्णय घेत इटखेड येथे एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. आठवडाभरापूर्वी दोघेही इटखेड येथे राहायला गेले होते मात्र … Read more

संतापजनक! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन शाळकरी मुलीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद प्रतिनिधी । चॉकलेटचे आमिष दाखवून एका दुकानदाराने दोन अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नराधम विरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गावातील एका किराणा दुकान चालकांनी एका शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्याघरात नेले त्या ठिकाणी त्यांच्यावर … Read more