सातारा जिल्ह्यात आणखी १२ जण कोरोना पोझिटिव्ह; एकुण रुग्णसंख्या पोहोचली ९२ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 2, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 8 असे एकूण 12 नागरिकांचा अहवाल आज कारोना (कोविड-19) बाधित आला आहे. यापैकी 11 निकट सहवासित असून फलटण येथील कोरोना केअर सेंटर मधील एका महिला आरोग्य सेविकेचा यात समावेश आहे, अशी माहिती … Read more

जीव वाचवायचा कि रोजगार वाचवायचा? दारू विक्रीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्या जगातील प्रत्येक सरकारपुढे जीव वाचवायचा कि रोजगार वाचवायचा असा यक्ष प्रश्न आहे. दारू विक्रीतून सरकारला श्वास घेण्यापुरता तरी महसूल मिळेल अशा भावनेतून दारू विक्रीचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र आज सोशल डिस्टेनसिंगचे नियम मोडून ज्या प्रकारे सर्वत्र दारू विक्री दरम्यान गर्दी झाली आणि त्या त्या भागात दारू विक्री बंद … Read more

सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोज देण्यास नकार; कराड पालिकेचे घंटा गाडीवरील कर्मचारी संपावर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात घंटा गाडीवर काम करणाऱ्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोज देण्यास नकार ल्याने दिल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हात जोडून सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोजची मागणी करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून काम करायचे असेल तर करा अन्यथा नका येऊ..माझ्याकडे बरेच लोक आहेत असे उत्तर मिळाल्याने याबाबत अनेकांनी … Read more

कराड मध्ये सापडला आणखी १ कोरोनाग्रस्त; २८३ जण विलगीकरण कक्षात दाखल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या एका नागरिकाचा अहवाल कोरोना (कोविड 19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत कराड तालुक्यात एकूण ६० कोरोनाबाधित सापडले आहेत.  आता … Read more

कृष्णा हॉस्पिटलमधून 2 कोरोनामुक्त पेशंटना टाळ्यांचा गजरात डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या बाबरमाची आणि चरेगाव येथील दोन्ही कोरोनाग्रस्त रुग्णांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. बाबरमाची येथील 32 वर्षीय युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो 18 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. तर कराड … Read more

कराड तालुक्यात २ नवे कोरोनाग्रस्त, जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या ७९ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या 2 नागरिकांचा अहवाल कोरोना (कोविड 19) बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आता सातारा जिल्ह्यात 68 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 9 … Read more

खाद्यतेलासाठी फिरणाऱ्या आजीला भेटली खाकीतील माणुसकी

कराड प्रतिनिधी |  सकलेन मुलाणी पेट्रोलिंग करत असताना एका पोलिसाला रस्त्यात आज्जीबाई भेटल्या. कुठे चाललाय म्हणून विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, घरात आठ दिवसापासून गोडेतेल नाही. त्या पोलिसाने त्यांना दुसऱ्या दिवशी विजय दिवस चौकात बोलावून गोडेतेलाची पिशवी दिली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि खाकीतल्या माणुसकीचे दर्शनही घडले. कराडमध्ये कोरोनाचा कहर झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या पन्नाशीपार गेली आहे. … Read more

Breaking | आणखी दोन कैद्यांना कोरोनाची बाधा, साताऱ्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७७ वर

साताऱ्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 77 झाला आहे.

खचून चालणार नाही; काम तर करावंच लागणारंय – आरोग्य संचालिका

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयामध्ये ६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. यानंतर राज्याच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी खचून चालणार नाही, काम तर करावंच लागणारंय असे म्हणत त्यांनी संपूर्ण आरोग्य विभाग कराड उपजिल्हा … Read more

कराड तालुक्यात आणखी २ तर साताऱ्यात १ जण कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५५ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड कृष्णा मेडिकल कॉलेज येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित २ महिला (वय वर्षे 16 व 37) व क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मुबंईवरून 17 एप्रिल रोजी आलेला तरुण (वय वर्षे 27) अशा 3 नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते कोरोना बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे … Read more