Friday, January 27, 2023

सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोज देण्यास नकार; कराड पालिकेचे घंटा गाडीवरील कर्मचारी संपावर

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरात घंटा गाडीवर काम करणाऱ्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोज देण्यास नकार ल्याने दिल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हात जोडून सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोजची मागणी करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून काम करायचे असेल तर करा अन्यथा नका येऊ..माझ्याकडे बरेच लोक आहेत असे उत्तर मिळाल्याने याबाबत अनेकांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

- Advertisement -

कराड शहरातील विविध पेठा व छोट्या मोठ्या वस्तीतून नागरिकांच्या घरातून कचरा गोळा करण्याचे काम पालिकेच्या घंटा गाडीतर्फे केले जात आहे. या कामाचा ठेका पालिकाने युनिर्व्हसल सर्व्हिसेस कंपनीला दिला आहे. कोरोनाच्या महामारीमध्येही घंटा गाडीवरील कर्मचारी जीव धोक्यात घालून शहरातील कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत. यामध्ये 18 घंटा गाडीवर 40 कर्मचारी काम करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या कर्मचार्‍यांनी ठेकेदाराकडे कोरोनापासून सुरक्षा व बचाव व्हावा म्हणून सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोज मिळावा अशी मागणी होती. मात्र ठेकेदाराने चक्क ही मागणी धुडकावून लावून ज्यांना काम करायचे आहे त्यांनी काम करा अन्यथा काम सोडून द्या, असे फर्मान काढल्याने कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. यामुळे मंगळवारपासून घंटागाडीवरील कर्मचार्‍यांनी संप पुकारला असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपयर्र्ंत संप सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले असून याबाबत प्रशासनाने गांभीर्याने निर्णय घेऊन या कर्मचार्‍यांचा सुरक्षेचाही विचार करावा, असे मत कर्मचार्‍यांनी व्यक्त केले आहे.