सत्तास्थापनेबाबत नितीन गडकरींच ‘हे’ विधान खरं ठरलं

आजची सकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात अचंबित करणारी ठरली. इतके दिवस सत्तास्थापनेच्या चर्चेत भाजप गायब होती तर तिकडे शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात नवं नातं सरकारस्थापनेच्या निमित्ताने तयार होत असताना. अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात भाजपने गनिमी काव्याचा वापर करत सत्तास्थानेच दावा केला, तो ही राष्ट्रवादीची बुलंद तोफ असणाऱ्या अजित पवार यांच्या मदतीने. अशाप्रकारे फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

लाज वाटावी असं राजकारण!

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज भाजप सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून या निर्णयांवर उलटसुलट चर्चा सुरु आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी लाज वाटावी असे राजकारण … Read more

सरकार स्थापनेची फायनल बैठक, मुख्यमंत्री म्हणून ‘यांची’ होणार निवड?

राज्यातील सत्तानाट्य अंतिम अंकावर येऊन ठेपल आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आता फायनल बैठक मुंबईत होत आहेत. या बैठकीत तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित आहेत. खातेवाटप आणि सत्तेची गणित या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. त्याअनुषंगाने या अंतिम बैठकीत मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.

अण्णा उठा ….आंदोलनाची वेळ झाली! जितेंद्र आव्हाडांचा अण्णा हजारेंना टोला

गेले काही दिवस सुरु असलेल्या सत्ता स्थापनेच्या मुद्दयांवर लवकरच पडदा पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस नेतृत्वाने गुरुवारी मान्यता दिली. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेशी आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे राज्यामध्ये शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान आता सत्ता स्थापनेच्या याच मुद्दयावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना टोला लगावला आहे.

सोनिया-पवार यांच्या भेटीत सत्तास्थापनेवर चर्चाचं न झाल्याने शिवसेनेची कोंडी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरु झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल आहेत. राज्यात अजूनही सत्ताकोंडी कायम आहे. अशा परिस्थिती पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यात सरकारस्थापनेच्या दृष्टिने याभेटीकडे सर्वांचे लागून होते. मात्र, याभेटीत शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल चर्चाच झाली नसल्याचे पवार यांनी सांगितलं. त्यामुळं शिवसेनेची कोंडी तर झाली नाही न असा सवाल उपस्थित झाला आहे.

कुणाचाही सरकार येऊ द्या, फक्त भाजपचे नको!- राजू शेट्टी

राज्यात अजूनही सरकार स्थापन होताना दिसत नाही आहे. मात्र, भाजपला राज्यात विरोधी बाकावर बसविण्याच्या पक्का निर्धार शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीने केला असताना स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवा असं विधान केला आहे.

मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांनी टाकली गुगली

काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा अद्याप सुरु आहे. वाटाघाटी प्राथमिक टप्प्यात आहेत. मुख्यमंत्रिपदाची मागणी कोणाची असेल, तर त्याचा विचार नक्की करावा लागेल, असं उत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं. नागपुरात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पवार गेले होते, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होण्यास कचरत आहे- नवाब मलिक

राज्यात सत्तास्थापनेवरून अजूनही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यामध्ये एकमत होताना दिसत नाही आहे. आज शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा योग्य दिशेनं चालू आहे असे सांगितलं आहे. मात्र काँग्रेस अजून सत्तेत सहभागी होण्यावरून संभ्रमावस्थेत आहे असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. याबाबत नवाब मलिक यांनी सूचक विधान केलं आहे.

‘आघाडी’चा एकही आमदार फुटणारचं नाही – सतेज पाटील

सत्तास्थापनेचा संघर्ष सुरू असताना काँग्रेसचे आमदार कोल्हापुरात दाखल झाले आहेत. आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूरच्या काँग्रेस कमिटीत येऊन मतदार संघाचा आढावा आणि इतर कामकाजाला सुरवात केली आहे. राज्यातील चालू राजकीय घडामोडीवर सुद्धा कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असून जयपूर, मुंबई दौऱ्यानंतर आता काँग्रेस आमदारांची कोल्हापूरात चर्चा सुरू झाली आहे.

चौकीदार चोर है ! या विधानावर राहुल गांधींचा माफीनामा

आज सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अवमान प्रकरणात कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है असे वक्तव्य केलं होत. या वक्तव्यावर कोर्टाने राहुल गांधी यांना माफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच न्यायालयाने राफेल प्रकरणातील पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. यासह शबरीमाला मंदिराचा निकाल देणाऱ्या कोर्टाने तो एका मोठ्या खंडपीठाकडे सुपूर्द केला आहे.