व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

लाज वाटावी असं राजकारण!

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज भाजप सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून या निर्णयांवर उलटसुलट चर्चा सुरु आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी लाज वाटावी असे राजकारण असे ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या ट्विटला अनेकांनी रिट्विट करत महाराष्ट्रात लाज वाटावी असं राजकारण झाल्याचं म्हटलं आहे. अजित पवार यांच्या भाजप सोबत जाऊन सत्तास्थापन करण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीदेखील व्हाॅट्सअॅप स्टॅट्स ठेवत कुटूंबात आणि पक्षात फुट पडल्याचे संकेत दिले आहेत. तसेच आपल्या आयुष्यात कोणीतरी फसवल्याची भावना झाल्याचंही सुळे यांनी म्हटले आहे.