‘तुबची-बबलेश्वर’चे पाणी देणारच अन्यथा जतमध्ये पाऊल देखील ठेवणार – विश्वजीत कदम

काँग्रेस  ही संकल्पना काँग्रेस उमेदवार विक्रम सावंत यांची असून या योजनेमुळे जतला पाणी मिळणार आहे. जतकरांना जर का हे पाणी मिळाले नाही तर मी जतमध्ये पाऊल देखील ठेवणार नसल्याचा निर्वाळा पलूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजीत कदम यांनी केला. येत्या जानेवारीत आम्ही दोन कारखान्यांचे काम सुरू करणार असल्याचे हे त्यांनी यावेळी सांगितले. ते काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचारार्थ बनाळी, शेगाव व कुंभारी येथील जाहीर सभेत बोलत होते.

आज ताकद दाखविली तरच पुढच्या निवडणुकीपर्यंत तुमचे अस्तित्व टिकेल, जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

काँग्रेस-राष्ट्रवादीने आता एकत्र काम करून भाजपचा पाडाव करणे आवश्यक आहे. आज राजकीय ताकद दाखविली तरच पुढच्या महापालिका निवडणुकीपर्यंत तुमचे अस्तित्व टिकेल, त्यासाठी आता कामाला लागावे व काँग्रेसला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिल्या. महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार पाटील यांनी आघाडी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आ.पाटील बोलत होते. बैठकीला उमेदवार पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, मनिषा रोटे, उत्तम साखळकर, नामदेवराव मोहिते, संजय बजाज, कमलाकर पाटील, मैनुद्दीन बागवान, महेश खराडे आदी उपस्थित होते.

‘राहुल गांधींच्या सभा भाजपच्या जागा वाढवतात’, मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना उपरोधिक टोला

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना पाहून मला आनंद झाला. कारण राहुल गांधी जेव्हा प्रचार सभा घेतात. तेव्हा काँग्रेसच्या जागा कमी होतात. आणि भाजपच्या जागा वाढतात. असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वेचे भाजप सेना महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

अंबरनाथमधील बंड शमले; राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराचा काँग्रेसला पाठिंबा

अंबरनाथ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने काँग्रेस उमेदवाराला समर्थन जाहीर केल्याने काँग्रेस राष्ट्रवादीत निर्माण झालेला तिढा अखेर सुटला. दोन्ही पक्षाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेत या वादावर पडदा टाकण्यात आला.

पतंगराव कदमांचे जावई संघाच्या शाखेत? लाड यांचा फोटो व्हायरल

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोधळे काँग्रेसचे जेष्ठ दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे जावई काँग्रेसचे कार्यकर्ते महेंद्र लाड यांचा संघाच्या शाखेतील फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. पतंगराव कदम यांच्या जावयांना संघाच्या शाखेत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पलूस शाखेच्यावतीने दसरा संचालन आज संपूर्ण … Read more

परभणी जिल्ह्यात ‘युती’ पाठोपाठ ‘आघाडी’ला देखील बंडखोरीची लागण

परभणी प्रतिनिधी। परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपा ‘युती’ला बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे. युतीच्या बंडखोरांनी बंडाचा झेंडा उगारल्यानंतर आता याच बंडखोरीची लागण ‘आघाडी’तील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला देखील लागलेली दिसत आहे. परभणी विधानसभेसाठी रविराज देशमुख यांचे नाव घोषित झाल्यानंतर, काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या सुरेश नागरे यांनी आता बंडाचा पवित्रा घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून परभणी … Read more

उदयसिंह पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज; पृथ्वीराज चव्हाणांच्या अडचणीत वाढ

सातारा प्रतिनिधी। कराड दक्षिण मतदार संघात यंदा तिहेरी लढत पहायला मिळणार असल्याचे चित्र आता समोर येत आहे. काँग्रेसचे माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील हे कराड दक्षिणमधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. उदयसिंह यांनी आज कोणतेही शक्ती प्रर्दशन न करता यशवंतराव चव्हाण समाधीला अभिवादन करुन पाटील यांनी अर्ज आज उमेदवारी अर्ज … Read more

चंद्रपूर विधानसभेसाठी काँग्रेस कडून ‘या’ शिवसैनिकाला उमेदवारी निश्चित

चंद्रपूर प्रतिनिधी | चंद्रपूर विधानसभेसाठी काँग्रेस कडून किशोर जोरगेवार यांचे नाव निश्चित झाले आहे. दिल्ली येथे जोरगेवार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये जोरगेवार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जोरगेवार यांनी शिवसेनेच्या तिकिटावर चंद्रपूर विधानसभा लढवली होती. यावेळी जोरगेवार यांना … Read more

पृथ्वीराज चव्हाणांना सोडून गेलेले सूर्याजी पिसाळ, शिवराज मोरेंचा आरोप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवाजी महाराजाच्या काळात एक पिसाळ झाला, मात्र आज लोकशाहीच्या काळात कराड दक्षिमध्ये एक सुर्याजी पिसाळ झाला, अरे गेला तर गेला मात्र येथे आमच्याकडे मावळे आहेत, असा टोला नाव न घेता आ. आनंदराव पाटील यांना शिवराज मोरे यांनी मारला. आ. आनंदराव पाटील यांच्यावर कॉग्रेसच्या कराड दक्षिणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी अत्यंत … Read more

नांदेडमध्ये एमआयएम उमेदवार काँग्रेस नेत्याच्या फार्म हाऊसवर

 नांदेड प्रतिनिधी। नांदेड उत्तर मधील एमआयएम चे उमेदवार अध्यक्ष फेरोज लाला आणि नांदेड जिल्हा प्रभारी महोमद जाबेर हे काँग्रेस नेत्याच्या फार्महाऊसवर गेले होते. बिलोली येथील कॉंग्रेस नेत्याच्या फार्म हाऊसमध्ये बंद दाराआड तब्बल एक तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. फार्म हाऊसवरील गाड्याचे आणि एमआयएम नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावरून एमआयएम काँग्रेसला … Read more