कराड तालुक्यात एका दिवसात 5 जण कोरोना पोझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या २६ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सदर पाच नागरिक कोरोना (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामुळे आता कराडकरांची चिंता वाढली आहे. … Read more

कराड तालुक्यात ४३ वर्षीय महिला कोरोना बाधित ; मृत ५ महिन्याच्या बालकासह ५५ अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित ४३ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ही ४३ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता १९ वर पोहोचली असून यातील ९ रुग्ण एकट्या कराड … Read more

कराडकरांची चिंता वाढली! आणखी २ जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल मध्ये उपचार घेत असलेल्या दोन संशियंतांचे रिपोर्टा आज पॉझिटिव्ह आले आहेत. कराड तालुक्यातील दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांच्या संपर्कात असलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आता समोर आले आहे. 38 पुरुष व 25 वर्षीय युवकाला कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे कोरोना बाधिताच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात … Read more

सातार्‍यात १७ वर्षीय तरुण कोरोना पोझिटिव्ह, दिवसभरात ३ रुग्ण सापडल्याने खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे  कोरोनाबाधित रुग्णांचा निकट सहवासित असलेल्या १७ वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. आज सदर तरुणाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाच्या तीन नवीन रुग्णांची भर पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर … Read more

कराडातील ३५ वर्षीय कोरोनाबाधिताला हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या काहिशा प्रमाणात आटोक्यात आल्याचे पहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत एकुण ७ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील ३५ वर्षांच्या तरुणाला आज डिसार्ज देण्यात आला. कृष्णा हाॅस्पिटल येथील सर्व स्टाफने या रुग्णाला टाळ्यांच्या गजरात निरोप दिला. संबंधीत रुग्णाने कोरोनाविरोधाच्या लढाईत सहकार्य करण्याची तयारी दाखवली असुन तो  … Read more

साताऱ्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ वरुन ११ वर; कराड, पाटण भागात नवे ४ रुग्ण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सध्या राज्यात एकुण २८०१ कोरोना बाधित रुग्ण आहेत. अाता यात आणखीन भर पडली असून सातारा जिल्ह्यात चार नवीन कोरोनाग्रस्त सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ७ वरून थेट ११ वर गेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सर्दी, ताप, घसा दुखीचा … Read more

कराडातील ५४ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे दाखल असणाऱ्या ५४ वर्षीय कोरोना (कोविड-19) बाधित रुग्णांचा आज पाहटे ५ वाजता मृत्यु झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु हा कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यातील कोराना बाधित रुग्णांच्या … Read more

धक्कादायक! डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला कोरोना रूग्णाची उपस्थिती, कराड तालुक्यातील घटना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६ वर पोहोचली आहे. यातील बहुतांश रुग्ण ग्रामिण भागातील असल्याने प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. आता या रुग्णांमधील एक रुग्ण डोहोळे जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कराड तालुक्यातील साकुर्डे गावातील एका डोहोळी जेवणाच्या कार्यक्रमास तांबवे येथील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांसह ११ … Read more

कराड तालुक्यातील ‘हे’ गाव सील, कोरोना रुग्ण सापडल्याने डोंगरी भागात खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनारुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.   राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८०० च्या वर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंर ६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यातील २ रुग्ण हे कराड तालुक्यातील असल्याचे समजत आहे. कृष्णा हाॅस्पिटल येथे उपचार घेत असणारा एक रुग्ण महारुगडेवाडी या गावातील असून कोरोनारुग्ण डोंगरी भागात सापडल्याने एकच … Read more

कराडात ६० वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह, तालुक्यातील रुग्णांची संख्या २ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल असलेल्या ७ कोरोना अनुमानित रुग्णांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. यावेळी सदर अनुमानित रुग्णांपैकी ६० वर्षीय पुरुषाचा कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कराड तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६ वर गेला आहे. … Read more